Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)

लेखांक ३९.

(नकल)
श्री.

१६१९ श्रावण वद्य ६.

दे॥ बै॥ देशमुख व मोकदम क॥ सासवड मावजी नाईक देशमुख मालजी पाटिल मोकदम सु॥ समान तिसैन अलफ कारणे साहेबाचे सेवेसी लेहून दिल्हा कतबा ऐसा जे आपण गोमाजी विश्वनाथ व चिंतो माहादेऊ व सिवाजी मुदगल पुरंधरे यांसी आपण कोरे कागदावरी सिके करून आपण दिल्हे आहेत हे वर्तमान साहेबांस विदित जाले त्यावरि साहेबीं आपणास हुजूर आणून सदरहू गोष्टीची तहकीकात लाविली आणि सदरहू कागद आणून देणे ह्मणून तगादा लाविला तरी इ॥ छ १९ माहे मोहरम त॥ छ १९ माहे रबिलावली दोहों महिनेयाने सदरहू कागद आणून देऊन जर मुदतीस कागद नेदूं तरी दिवाणेचे गुन्हेगार हा कतबा सही छ १९ माहे मोहरम सदरहू कोरे कागद च्यार त्यावरी सिके करून दिल्हे आहेत मुदतीस आणून देऊन हा कतबा सही

गोही

विसाजी नीलकंठ देशकुलकर्णी प्रा।
वाई १
बलवंतराव नारायण कुलकर्णी
मौजे बेलसर १
रायसेटी व गोपालसेटी का। सिरवल १
गोंदमाली मेहत्रा क॥ म॥ १
अताजी नरसिंह कुलकर्णी मौजे बुध १
मलसेटी पांढरकामा क॥ म॥१


लेखांक ४०.

१६१९ माघ वद्य ११.

इजत असार मालोजी ना। व गोविंदराऊ देसमुख व देसपांडिये पा। पुणे सु॥ सन हजार ११०७ मालूम दानद की कोटवाडीस होतो तीन महिने जाले आणि तुह्मी एऊन कोटाची सरबराई केली नाही यावरून अजब वाटले याउपेर देखत परवाना तुह्मी तमाम एथे एणे आणि कोटाची तजवीज करणे तुह्मी ह्मणाल की करेपटार आहे मोरो विश्वनाथ हि तेथे आहेती तर आजि तीन महिने करेपटाराने काम चालविले तुह्मी काही आगोधर सूचना करून बेगारी अगर टके पाठऊन एक देसपांडिया एऊन सरबराई केली नाही यावरून काय ह्मणावे आता देखत परवाना सिताब हजूर एणे काम बंद जाले आहे उपेर आलस जालिया मसाला पंचवीस रु॥ होईल ऐसे बरे समजणे छ २४ रजबु.