Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
सदरहू जणानी राजश्री यादो नामदेव देसकुलकर्णी ता। कर्याती मावल यास पत्र लेहोन दिधले ऐसे जे तुम्ही आपणास पुसिले की हजरती पातशा तुलापुरीचे मुकामी सन तिसैन अलफ मधे मु॥ होते त्या प्रसंगीं आपण मर्हास्ट राजा या मधे होतो त्यास तुलापुरी कुल अवघे देसक लस्करांत जमा जाहाले होते ते समई तुम्ही हि अवघे तुलापुरास गेले होतेस तेथे तुम्ही होनप देसकुलकर्णी पा। पुणे यास राजीनामा व महजर लेहून दिधला आहे की का। मावलचे देसकुलकरणी कडे नव्हत देसपांडे होनप होत ऐसा राजीनामा होनपास लेहोन दिधला आहे याचे वर्तमान कैसे काय आहे त्याच निर्वाह करणे आपण पुरातन व्रीतिवंत देसकुलकर्णी होऊ किंवा न हो तुम्ही त्यास राजीनामा काय निमित्य करून दिधला आहे त्याचा निर्व्हा दिवाणांत व तुम्ही समस्त गोत ता। मा। निर्व्हा करून देणे म्हणौनु सदरहू जणास पुसिले तरी आपण काही होनपास राजीनामा लेहोन दिला नाही त्याचा करीना ऐसा जाहाला आहे आपण उभयता देसमुख ता। मजकूर सितोले देसमुख प्रा। पुणे तिसैन अलफ मधे तुलापुरास गेलो होतो तेथे आपणास नातवान देखोन सितोलियानी आपणासी कथला केला की ता। मा।चे देसमुखी वतन आपले आहे ऐसा कथला केला त्यावरी आपण दिवाणामधे उभे राहोन गोतमुखें देसमुखी आपली खरी करून घेतली सितोलेयासी समंध नाही ऐसे जाले आपण नातवान दिवाणांत दरबारखर्चास टकापैका पाडिला त्यास आपणास नातवानीमुळे कर्जवाम मिले ना याबदल होनप देसकुलकर्णी पुणेकर यापासी उभयता देसमुख मिलोन घेतले रुपये ३२०० कर्जवणे रु॥ १६०० पायगुडे रु॥ १६०० एणेप्रमाणे कर्ज घ्यावयाचा निर्वाह करून चौघ पाटिल जमान दिधले
कृष्णाजी पाटिल चौधरा मौजे सूस १ |
खेवजी पाटिल माझेरा भुकुम १ |
मोकदम मौजे भूगौ | कान्होजी पाटिल कोलेकर |
बालोजी भीवजी |
मौजे माहाळंगे |
पाटिल पाटिल |
|
गवला चौधा |
एणेप्रमाणे जमान दिधले पैकियास ऐवज देसमुख व देसकुलकर्णी यांचा हक जो उत्पन्न होईल तो पाचा वरसामधे फेडून घ्यावा आदिकरून फाटियाची मोली व पत्रावलीचे पान कर्जांत घ्यावे ऐसा तह करून घेतला आणि सेवटीं पैके दिल्हे नाहीत पैके देईनासारिखे जाले आपणास तरी पैकियाचा तगादा बहुत लाविला त्यास होनपानी मकसूद घातला की कडे देसकुलकर्णी गैरहाजीर आहेत त्याचा देसकुलकर्णियाचा महजर करून देणे म्हणिजे तुम्हास सितोलेयाच्या भांडणास ढका लागेल तो कर्ज देऊन म्हणऊन अडऊन रात्री बोलाऊन दुर्गोजी रविराऊ व परसोजी करजवणे यासी नेऊन कोरे कागदावेरी सिके करून घेतले आणि मग आपणास सिके करून दिल्हे ते समई देसमुखाचा बापभाऊ व मोकदम कोन्ही जवली नव्हे ते दुसरे दिवसी दुर्गाजी पायगुडे याणे कृष्णाजी पाटिल मौजे सूस याजवली सांगितले की रात्री होनपानी आपणास आडऊन डौलावरी सिके करून घेतले परंतु त्या डौलावरी पाटिलाचे नांगर व गोही कोन्हाची नाही कोरे कागदावरी सिके मात्र करून घेतले त्या कागदावरी होनपानी काय लिहिले असेल ते दखल नाही आपणास जरून जिवावरी एऊ लागले याकरिता डौलावरी सिका मात्र करून दिल्हा आहे आपण राजीनामा करून दिल्हा नाही आपणास कडे देसकुलकर्णी खरे आहेत दुसरा देसकुलकर्णी आपणास दखल नाही पुरातन कारकीर्दी कडियाचे देसकुलकरण हे आपले वडिलवडिलानी सांगितले आहे. होनप देसकुलकर्णी पुणियाचे यास कर्याती मावलाच्या देसकुलकर्णास समंध नाही देसकुलकर्णी कडे खरे पुरातन पिढी दर पिढी आहेत. होनपास समंध नाही आम्हास आडऊन डौलावरी सिके करून घेतले तेथे मनास मानेल तैसे लिहिले असेल ते खोटे असे. ए जातीचा करीना जाला असे सदरहूप्रमाणे तुम्हास पत्र लेहोन दिधले असे यास काही अंतर होईल तरी आपण दिवाणीचे गुन्हेगार व गोताचे खोटे तुमच्या वतनाचा जाब करून देऊन.