Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सतरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७.
१५५९ माघ वद्य ७.
''मसुरल हजरती राजश्री दादाजी कोंडदेऊ सुभेदार
नामजाद व कारकून किले कोंढाणा व माहाला निहाय
देसमुख व देसक
तपे खेडबारे ता। मोसेखोरे
देसमुख बालाजी यसवंतराऊ
तुलजी कानजीदेसमुख ता। म॥
देसक व कुळकर्णी.
बापूजी मुदगल. भानजी नाईक. बापूजी जीवगण.
देसकुलकर्णी. पासलकर. ता। आंबी.
नागोजी नावडिकर. गोजो सोमनाथ.
अजहती देसमुख देसकुलकर्णी
ता। मा। बिकलमऊ
ता। कानदखोरे देसक ता। गुंजण मावळ
गोजप्रभु येसजी व बाब- होमाजी मोकदम
बाबाजी देसकुलकर्णी जी मोकदम मौजे
जुझारराऊ देसमुख ता। मा। वागिणी मौजे-
ता। मा।
सोनजी मोकदम. तुलाजी मोकदम.
कोलवडी. मौजे जांबुली.
गबाजी व रामाजी आ। बालाजी जनार्दन.
देसकुलकर्णी ता। मा। खासनिस
सु॥ समान सलासीन अलफ कारणे हजीर मजालसी महजर केला ऐसा जे, बाहूजी बिन कान्होजी हैबतराऊ व हबाजी बिन बाबाजी हैबतराऊ, व बाळाजी बिन रुद्राजी हे ता। गुंजण मावलाचे देशमुखीबदल भांडत होते. यावरी साहेब व गोत मिलोनु येणेप्रमाणे निवाड केला. बालोजी मूळपुरुष. त्यासी दोग पुत्र. वडिलाचे नांव हउजी हैबतराऊ आण धाकटा रुद्राजी. यावरी बालोजी वडिल देसमुखी करीत होता. तो मेलियावरी हऊजी हैबतराऊ वडिल पुत्र तो देसमुखी करू निघाला. तो हऊजी हैबतराऊ पुणा हवालदारी मारिला ! हउजी हैबतराऊ मारिले यावरी बाळाजी बिन हऊजी हैबतराऊ तो देसमुखी करू लागला. त्यावरी कोंडे देशमुख ता। खेडेबारे त्यासि झगडावयासी आला. तो झगडा पडिला. त्यावरी त्याची माय सीताई दुखे दादलाहि पडिला व लेकहि पडिला या दुगे आगी निघो लागली. मग तिचा दीर रुद्राजी तो ह्मणौ लागला जे, बाई तू आगी निघो नको. आपले दोघे लेक आहेती. वडिल बाजी धाकटा हउजी हैबतराऊ लेक हा तुज तूते दिधला आहे. सुखे तू देसमुखी चालउनु असणे. यावरी हउजी हैबतराऊ देशमुख ह्मणौनु त्याचे नाव ठेउनु सकल कारबार रुद्राजी करीत आहेती. यावरी रुद्राजीची बाईल मेलियावरी दुसरी धाकटी बाईल रुद्राजीस होती तीस बालाजी पुत्र जाला. सीताईस पुत्र दिधला तो देखील रुद्राजीचे तिघे पुत्र सीताईस हऊजी हैबतराऊ देसमुखीचे नाव ठेऊनु दिधला होता. तो गोत्रजी मारिला. त्यासी बाबाजी हैबतराऊ लेक होता. तो बाबाजीमधे व रुद्राजीचा वडिल लेक बाजी त्या त्या मधें देसमुखीची करकर लागली. बाजी ह्मणो लागला जे आपण रुद्राजीचा वडिल पुत्र असतां, तुज देसमुखीची निसबती नसतां, तू देसमुखपी चालवावयासी कोण ? असे ह्मणौनु रुद्राजी जिता असता बाजीने रुद्राजीपासूनु सिका घेउनु देसमुखी आपण चालऊ लागला बाजीने देसमुखी केली. बाजी मेलियावरी बाजीचा लेक कान्होजीने देसमुखी केली. पर याचा निवाडा जाला नाहीं. करकर याची दिवाणामध्यें व गोतात होतच असे. बाबाजी मालुमातीची खुर्दखते आणि दर देसमुखीचा निवाडा जाला नाहीं. कान्होजी देसमुखी करीतच असे. यावरी बाबाजी मुरुंबदेवी झगडा पडिला व कान्होजी कोंढाणा सिदीने मारिला. यावरी कारकिर्दी घोरपडे तिही ता। म॥ चे गावाचे तकसिमा च्यारी केलिया. पैकी बाहुजी बिन कान्होजी हैबतराऊ यासी वडिलपणाची तकसिम एक व वाटियाची एक तकसिम एकूण तकसिमा २ गाव निमे दिधले. तकसिमा दोन उरलिया, त्यांत एक तकसिमा बाबाजी हैबतराऊ एक तकसिम १ व बालाजी नाइकास एक तकसिम ऐस्या दोनी तकसिमा गाव निमे दोघास दिल्हे. गाऊ समीन निमीन पाहोनु वाटिले नव्हते व कागदहि केला नव्हता व नांगराचा निवाडा जाला नव्हता. याकरिता करकरीतच आहेती. याकरिता तपाहि लागला नव्हता. मग हाली हे आणौनु याचा याचा येणेप्रमाणें निवाडा केला. अज देह देखील मजरे व इनामती देह ८१ एकीयासी व मजरे २ गावाचे गावाखाले लिहिले आहेती. याकरिता देह येकीयासीच ता। बालाजी मूलपुरुष त्याचा धाकटा भाऊ चाहूजी त्याचे बुडीच फुलाजी व बाजी त्यासी समाईक देह पैकी देह देखील इनाम ५ तपसिल :-