Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सतरावा (शिवकालीन घराणी)
यावर हजरती मा। साहेबी त्यासि तलब केलियावर त्यास मालूम जाले की, हुजुरुनु तलब येते. यावर तलब माहाली आली नसता आपला आजा बाजी हैबतराऊ हुजूर गेले. याउपर बाबाजी मजकूर राजश्री राऊतराऊ मुकासी यासी लुसकती दिधली. घोडी १ व फिरंग १ देउनु माहाली येयाची रजा घेउनु माहाली आला. याउपर आपलिया माया २ दोघीजणी व आऊबाई मावळन व चुलते सुर्याजीबावा व दमाई आईजी हे माहाली ठेउनु आमचे आजे बाजी नाईक हे हुजूर मलिकापासी गेले होते. यावर बाबाजी एउनु माणुसे घरामधोनु बाहेर काडिली व उदंड जाजती करिता तकसीर केली नाही. यावर आपली मावळन आऊबाई होती तिणे आमचा कूली समाचार जो जाला तो त्यास लिहिला की, तुमचे मागे बावाजीने ऐसी ज्याजती केली ह्मणौन तपसिले लिहिले. याउपर आपला आजा बाजी हैबतराऊ याही मलिकापासी जाऊन अर्ज केला कीं, साहेबी नफर मजकुरास तलब केली. हे आइकौनु सेरीकर साहेबाचे बांदगीस आला आणि मागे बावाजी यावरी बाजी मलिका हुजूर उभा राहिला की, माघे मुलालेकरासमान साहेबाची तलब जाहाली ह्मणउनी आइकिताच तलब माहालासी आली नसता साहेबा हुजूर आलो. यावरी बावाजीने मुळाबाळास हाडाहाड केलियावरी, मलिकानी राउतराऊ मोकासी त्याचा हेजिब रुद्राजीपंत बोलविला की, तुह्मी ये काय बदल करिता ? यावरी त्या हेजिबाने राउतरायासी आपला हाते रोखा लिहिला की तुह्मी हे कायबदल करिता ? बाजीच्या एरिदियास हुजूर तूर्त पाठविजे; नाहीतर तुज ताकीद होईल. यावरी राउतराऊ माहालासी येऊनी बावाजीस हुजूर रवाना केलेयावरी मलिकाचे दादनीस बैसोन दोघाचे वादे उभे केले. यावरी हरदो जनाची मनुसिभी पाहून आमचा आजा बाजी नाईक याही खुर्दखत देउनी देसमुखी देऊन रवाना केले. बावाजी मजकुरास दूर केले. बाजी सालासी येऊन देऊन देसमुखी चालऊ लागला. बावाजी बेटा केला होता. तो माघे एक वरीस राहून मालुमातीचे खुर्दखत काढिले. नागोजी भास्कर याने काढून दिल्हे. ते खुर्दखत घेऊन दरबारा बाहीर आले. यावरी आपला बाप कान्होजी हैबतराऊ तेथे होते. त्यानी बावाजीस पदरी धरिले की, तू मालुमातीचे खुर्दखत कैसे नेतो ? तुवा आह्मी मागत्यान वाद सांगावा. यावरी नागोजीने मलिकाचा माहालदार थोताडे आनून याचा पदर सोडविला. मग तो माहालासी आला. यावरी आमचा आजा बाजी हैबतराऊ मागत्यान हुजूर गेले. हुजूर जाताच मुल्ला नबीब यास दिवान बारा मावळे दिल्ही. त्याचा सुभेदार रायाराऊ मुलकाला आले. आपल्या बराबरी बाजी हैबतराऊ घेउनी आले की, तुझा पेसजी जो काय निवाडा जाहला असेल तेणेप्रमाणे तुझा निवाडा करून, ह्मणउनी घेउनि आले. यावरी बावाजी हि त्यास भेटला. मग रायाराऊ ह्मणो लागला जे. तुह्मा हरदोजणाची मुनसिभी करितो. याउपरी बालाजीस रजा दिल्ही. यावरी बालाजी नाईक कारबारास ठेवुनि बावाजी पुने घरावरी गेला. यावरी नीलकंठ राऊ यासी व रायाराऊ यासी कलहो लागला. यावरी गडासी वेढा घातला. यावरी मलिक साहेबाच्या खुर्दखतावरून आमच्या वडिलाचे हावाला देसमुखी केली. देसमुखी करिता आपला आजा मेला. यावरी रायाराऊ साहेबी काढिला यावरी मलिक साहेबाचे हवालदार काजी सेक साला येउनी मलिक साहेबासी लेहून या हरदो जणासी तलब करून बावाजी वा कान्होजी हैबतराऊ आपला बाप हुजूर घेऊन गेले. गेलियावरी आपला बाप वा बावाजी मुनसीभीस उभे केले. दोघानी आपला खुर्त खत पुढे ठेविला. मलिकसाहेबी पुसी केला की, दोही कागद कोन्हाचे ? आपले बाप बोलिला जे साहेबाचे कागद आहे. याउपरी बावाजीला पुसिले हा कागद कोणाचा आहे ? यानी जबाब दिल्हा की, साहेबाचा कागद आहे. मलिक बोलिला की मलिक दोगं की एक ? याउपरी कारकुनासी पुसी केली. यावेरी कारकून मजालसी खंडो कृष्ण व नागोजी भासकर व मजालसी कारकून यास पुसिले. ते बोलिले की मलिक एक व सिका एक. यावेरी मलिक बोलिले की, अवलका निवाडा आपण केला आहे. हाली आपली अमल चोरोनु मालुमातीचे खुर्दखत करून कोण्ही दिल्हे आहे ? यावेरी कारकून कोण्ही बोलेतीनात. मग मलिकसाहेबास कळों आले की, कारकूनी हा अमल केला. मग खंडो कृष्ण यास ताकीद फर्माविली. मार केला. होनु हजार एक लाविले. व नागोजी भास्करास ताकीद करून दरबार मुतलबा केला. मार केला.