Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सतरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १०.
१५७९ चैत्र वद्य २
''महजर व तेरीख १५ माहे जमादिलाखर बिहुजूर हाजीरमजालसी सदर राजश्री सिवाजी राजे साहेबु मुकाम कसबे पुणा
काजी अबदुला बिन काजी महमुद हकीमशरा व काजी
नायब काजी पा। पुणा
(फारसी सही)
रख्तखाना
बाळाजी बिन रुद्राजी नाईक सिलंबकर
देसमुख तपे गुंजणमावल तपे मजकुरीचे देसमुखीबदल तिघेजण आपण आपणांमध्यें भांडत राजश्री साहेबांपासीं आले. साहेबी हुजूर मुनसुफी खातिरेसी आणितां, तिघां वर्गाचा मूळपुरुष बाळोजी सिलंबकर. त्याचे दोघे पुत्र :- वडिल पुत्राचे नाव बापूजी हैबतराऊ धाकुटा पुत्र रुद्राजी बाळोजी देसमुखी करीत होता. तो मयत जालिया उपरी बापूजी हैबराऊ वडिल पुत्र तो देसमुखी करूं निघाला. तो बापूजी हैबतराऊ पुणां हवालदारीं मारिला. तो मारिल्यावरी बाबाजी बिन बापूजी हैबतराऊ देसमुखी करूं लागला. याउपरी कोंडे देसमुख तपे खेडेबारें यांसीं झगडावयासी आला. तो झगडा पडिला. त्यावरी त्याची माय सीताई, दादला पडिला व लेंकहि पडिला त्यादुखे आपण आगी निघेन ह्मणौनु ह्मणो लागली. मग तिचा दीर दादल्याचा धाकुटा भाऊ रुद्राजी ह्मणो लागला जे, बाई तूं आगी निघों नको. आपले दोघे लेंक आहेती. वडील बाजी धाकुटा लेंक हबाजी हैबतराऊ हा तुज आपण दिधला आहे. सुखें तपे मजकूरीची देसमुखी चालउनु असणे. त्यावेरी हउजी हैबतराऊ देसमुख ह्मणौनु त्याचें नाव ठेउनु सकल कारबार रुद्राजी करीत असे. यावरी रुद्राजीची बाईल मेली ह्मणौनु रुद्राजीने दुसरी बाईल केली. तीस बाळाजी पुत्र जाला. सीताईस पुत्र दिधला त्याचें नाव हउजी हैबतराऊ देसमुखीचें नाव ठेउनु दिधला होता. तो गोत्रजानी मारिला ! त्यासी एक लेक बाबाजी होता. त्यांमधे व रुद्राजीचा वडील लेंक बाजी हरदो जणांमधें तपेमजकूरीचे देसमुखीची करकर लागली. बाजी ह्मणो लागला जे, आपण रुद्राजीचा वउील पुत्र असतां तू आपला धाकुटा भाऊ असतां वडिले हाती दिधला आहेस, एव्हडियाच वरून वडीलपण करूं पाहतोस कीं काय ? ऐसे बोलोनु रद्राजीस व बाबाजी हैबतराऊ यासि दस्त करून किले मुरूंबदेवावरी राखोनु हिरोनु घेतला, आण आपण देसमुखी करूं लागला. यावेरी रुद्राजी ह्मातारा होता तो मयत जालियावेरी कारकिर्दी मलिक अंबर हुजूर जाउनु आपला हाल हवाल तमाम मालूम करून, तपेमजकूरीची देसमुखी आपल्या नावे मोकरर करून खूर्दखत घेउनु माहालास आला आणि तपे मजकुरीची देसमुखी करूं लागला. त्यावेरी कारकिर्दी मुल्ला महमद बाजी हैबतराऊ मयत जाला. यावेरी कान्होजी फर्जंद बाजी हैबतराऊ मलिक अजमापासीं जाउनु बाबाजी फर्जंद हबाजी हैबतराऊ यासि तलब करून हुजूर नेलें. यावेरी हुजूर मालूम केले जे, वडिले घरीचा आपण बाबाजी आपल्या धाकुट्या चुलत्याचा लेंक ऐसें मालूम करून आपल्या नावें देसमुखीचें खुर्दखत घेतलें. आपला चुलता हबाजी वडिले घरीं दिधला होता हें जाहीर केलें नाहीं, आणि खुर्दखत घेऊन माहालासी आला; देसमुखी करूं लागला. ऐसे आपणांमध्यें आपण खलेल करून विलातीमध्यें धिंगाई देसमुखी करीत मलिक अजमाचे थोर दरबार जे वख्ती ज्याचा रस दिवाणांतु पडे तेवख्तीं रीघ करून आपल्या नावें खुर्दखतें मालुमातीचीं आणौनु देसमुखी करीत दर बरहक निवाडा जाला नाही. यावेरी बाबाजी फर्जंद हबाजी हैबतराऊ किल्ले मुरुंबदेवीं दिवाणीचे मसलतीस झगडा पडिला. कान्होजी फर्जंद बाजी हैबतराऊ किल्ले कोंढाणां सिदी अंबरें मारिला यावेरी तपे मजकूर माहाराज साहेबांस मुकासा अर्जानी जाला, तेवख्तीं राजश्री दादाजी कोंडदेऊ सुभेदार नामजाद किल्ले कोंढाणा व माहालनिहाय इहीं मनास आणौनु तकसीमा करून देहाये मजकूरीचा हक लाजिमा व इनामती व इसाबती व कुल उत्पन्न वाटणी करून दिधली. तकसिमा च्यारी केलीया तपसिल :-
बापूजी बिन कान्होजी हैबतराऊ नांगराची वडीलपणाची तकसिम
तकसिम एक १ एक १
सदरहू तकसिमा केलिया व नांगर बापूजी बिन कान्होजी हैबतराऊ येणे एकी आपल्या वटियाची तकसिम व नागर वडिलपणाची तकसिम एकी एकूण तरफ एकी यावेरी बापूजीने नांगर करावा दुसरी तरफ हबाजी बिन बाबाजी हैबतराऊ याची वांटियाची तकसिम एकी व बालाजी बिन रुद्राजी याची तकसिम एकी एकूण तरफ एकी यावेरी हबाजी बिन बाबाजी हैबतराऊ एणें नांगर करावा ऐसा निवाडा केला. नांगराची वडिलपणाची तकसिम काढिली ते बापूजीस दिधली. अंजी सबब नांगर दोघानी करावे आणि नांगराची तकसिम बापूजीस दिधली होती ह्मणौनु हबाजी बिन बाबाजी हैबतराऊ भांडत हुजूर आले. यावेरी हजीरमजालसीस साहेब व गोत बैसोनु पहिलें पासुनु हकीकती मनास आणिली. वडिलपणांची रदबदल व मलिकअंबराच्या खुर्दखतांतील मकसुद कुल बरे रीती मनास आणौनु, समजौनु, राजश्री दादाजी पंडित सुभेदार इहीं निवाडियाचा महजर केला होता तो मनास आणौनु पाहातां, तींही दोनी देसमुखीचे नांगर व दोनी तरफा केलिया आहेती तें बरेच केलें आहे. आमा दोनी च्यारी मुनसुफीयांचे पेंची राजश्री दादाजीपंतांची नजर पडिली नाही कीं, बाळाजी नाइक दोघांचा धाुकटा भाऊ असोनु याचे तकसिमेचे सारे गाऊ हबाजीच्या सिक्याखालीं असावे याची काय गरज ? जेव्हा अरधे गाऊ बापूजीच्या सिक्याखालीं व आरधे गाऊ हबाजीच्या सिक्याखालीं ऐसें दादाजीपंतांचे महजरांत असावें तें नाही, तेव्हा तिसरा भाऊ बाळाजी नाइक यासि वांटाच नाही ऐसें दिसते. जरी बालाजी नाइकास तिसरी तकसिम दिधली आहे हें नजरेन पाहावें, तरी नांगराचा हबाजी हैबतरायाचे तरफेस आरधा वांटा नाही. तुसताच नांगर ऐसें दिसों आलें. याबदल साहेब व गोतानें मनास आणिलें कीं, हबाजी वडिले घरीं दिधला आहे म्हणौनु वडिल बाजी रुद्राजीचा वडील लेंक म्हणौनु वडील ऐसी दोघांस वडिलपणांची निसबती आहे व करकसा हि तीन पिढियां लागला आहे; त्याबद्दल साहेब व गोतपतीने बरवे रीती विचारून ऐसा तह दिधला कीं, वडिलपणांची तकसिम दोघांस बराबरी व पाने व लुगडीं दोघांस बराबरी वडिलपणांचे तकसीमेचे गाऊ दोघांस बराबरी ऐसा तह दिधला व बालाजी नाइक तिसरा भाऊ तो दोघांचाहि धाकुटा भाऊ याबदल याचे तरफेचे गांवींच हकलाजिमा व इनामती व इसाबती उत्पन्न बालाजीनें खाणें आणि दोघांच्या सिकियाखालें बालाजी नाइकाचे तकसिमेचे गांऊपटीस बराबरी दोघांखालीं लिहिणें ऐसा तह दिधला. त्याचा निवाडा एणेप्रमाणें केला. बितपसिल तपे मजकूर अज देह मौजे व मजरे ८३ पैकी मजरे दोनी गांवाचे गांवाखाली लिहिले आहेती म्हणौनु वजा केले २ बाकी देह ८१
खालिसा देह १४॥ इसाबती देह ६॥
सरदेसमुख देसमुख ता।
देह १ मजकूर देह ५॥
एकूण कास खंडी १११३ यासि बाद इसाबती सरदेसमुख देह मौजे वागिणी १ एकूण कास खंडी ३२ बाकी देह ८० एकूण कास खंडी १०८१ यासि बाद खंडी ३८॥. ता।
सदरहूप्रमाणें निवाडा केला असे. एणेंप्रमाणें तकसिमा आपलालिया खाउनु दिवाणकाम चालवणे. याखेरीज विस्वाघाट व बाजे हक उत्पन्न समाइक जे होईल तें तिघीजणी तकसिमप्रमाणें खाणें. बालाजीचे गांउ दोघांखालीं लेहोनु दोनी पटिया तपामध्यें लेहोनु आपलाले पटीवरी जागा करणें. पाने व लुगडीं दिवाणांतून बराबरी घेणें. मागें पुढें न घणें. दोघांजणांसी पाने व लुगडीं देतील त्यामागें बालाजी बिन रुद्राजी यासि देणें. तिघांजणांसी पाने व लुगडी वोळीने देतील ते वोळीस फुलाजीस व बाजी व तुलाजी व सांउजी यांसि पाने व लुगडीं देतील ते वोळीस आधीं फुलाजीस व बाजीस व तुलाजी व सांउजीस देणें. त्यामागून खोतांस व मोकदमांस देणें. तरफा आपलालिया लावाविया. एकाने एकाचे तरफेस मन घालावयासि निसबती नाही. फुलाजी व बाजी यांणी मौजे केतकवणे निमे इसाबती व निमे खालिसातीचा तेथील देशमुखीचा हक व पांचां गावीच्या गांवखंडीया खंडीं पांच व तपे निसबती टके २०० दोनिसे एणेप्रमाणें खाउनु असणें. वरकडास कांहीं समंध नाही. तुलाजी व सांउजी त्यांसी मौजे कोदलवाडी देह १ तेथील देशमुखीचा हक व लाजिमा व इनामती सेत कसबे अंबोणे महसूल टके १२॥ साडेबारा खाणें एणेप्रमाणे तपे मजकूरीचे देशमुखीचा निवाडा हुजरूनु करून दिधला असे. बापूजी बिन कान्होजी हैबतराऊ तकसिम दीड १॥ वाटियाची एका वडिलपण नागराची निमे .॥. हबाजीं बिन बाबाजी हैबतराऊ तकसिम दीड १॥ बाबती वाटियाची एकी व नागर वडिलपण निमे .॥. बालाजी बिन रुद्राजी नाइक वाटियाची तकसिम एकी एकेप्रमाणे आपलाल्या तरफा लावणी उगवणी करून, दिवाण काम चालऊनु, आपले पिढी दर पिढी लेकराचे लेकुरीं सदरहू निवाडेप्रमाणें खाणें. यासि निवडिल्या अमलास जो कोण्ही हिला हरकती करील तो दिवाणाचा गुन्हेगार व गोताचा अन्याई. ब॥ हजर ही श्री सके १५७९ हेमलंबी संवछरे पेसजीचे कागद निवाडियाचे दादाजीपंताचे महजर व मलिकांची खुर्दखतें ज्यापाशीं असतील ते रद असेती'' (फारसी) तेरीख १५ माहे जमादिलाखर सुरुसुद.