Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ११.

१५८१
फारसी

'' अज सरसुभे खान आलिशान एकबालनिशान सिपेसालार दौरानी बादज तारीफ खान अफजले खान महमदशाही बुलंब आयाम दौलत हू ता। विठोजी हैबतराऊ देसमुख त॥ गुंजर माउल मालूम दाद सु॥ सितैन अलफ दरींविले तुमचे बाबें र॥ कृष्णाजी भास्कर द॥ प॥ वाई येहीं बहुत वजानें तारीफ करून मालूम केलें, त्यावरून खातिरेसी आलें. तुह्मी लोक कमामाचे नामोसी असां. हा वख्त कामाचा आहे. कोणेबाबें जरा अंदेशा न करितां खातीरजमा राखून जाउलेजवळी आपुले लोक दे॥ येउनु जैसे कांहीं फर्मावितील ते ब॥ मसलहतेस दिल जाब सुशरिक होउनु नेकखोही जाहीर करणें. पाहिजैसे मुजरा व सरफराजी होईल ये कि॥ जाणिजे.''
फारसी

लेखांक १२.

१५८७ श्रावण वद्य १

'' महजरनामा हजीरमजालसी बिहुजूर देसमुख व देसकुलकर्णी व देसक ता। गुंजणमावळ बि तेरीख माहे १४ माहे सफर बिहुजूर देसमुख व देसक त॥ गुंजणमावळ त॥

बाळाजी नाईक देसमुख ता। म॥
फारसी
गोमजी श्रीपति व त्रिंबक श्रीपति देसकुलकर्णी ता। मा।

देसक

धाकजी बिन येसजी चोरघे सरखोत
त॥म॥
सुर्याजी नाखती व बापुजी बिन
दादजी थिटा मोकदम हतवे बु॥
धाउजी बिन राजजी लेकवळे
मोकदम मौजे मोहरी बु॥
नरसोजी चौगुला मौजे बोरले
चिमणाजी तानदेऊ खासनीस दि॥
देसमुख ता। मा।र
माणको नारायण हेजीब ता। मा।
कोंडाजी व मातजी लिम्हण मौजे
पारवडी
चांदजी व मंबाजी डिवळ मौजे
 निगडे बु॥
एसजी बिन विठोजी सोंडकर मौजे
तांभाड
सोनजी फुदाला मौजे कोलवड
माहादजी व रामाजी कारले मो।
मौजे सोंडे
बाजी पिलाणा खोत सोंडे हिरोजी
तुलाजी तळेकर मोकदम का।
आंबोणे ता। मा।
नांगर
सूर्याजी व कोंडाजी व सोनजी
सरफुले मो। मौजे सोंडे
माहानाक वा। गणा ता। मा।
काटरागा माहार मौजे वडगाव
त्रिंबकभट पुरोहित ता। मा। निशाण पातडे

सु॥ सीत सीतैन अलफ श्री सके १५८४ नंदन नाव संवछरे ते दिनी बकाजी बिन येसजी झांजा मोकदम मौजे वडगाव ता। मा। मौजे वडगावीची मोकदमीस कोन्ही मिरासदार नाही, तेथील मोकदमी देसमुख ता। मा। याची मिरासी होती, आपले खुसीने बकाजी बिन येसजी झांजा यासि मोकदमी मिरासी करुनु दिधली ते आपले लेकराचे लेकरी व पालनुक टिला विडा कुल खाउनु कीर्दमामुरी करणे. यासि कोन्ही हिला हरकती करील त्यास आपण निवारुनु व आपले वंसीचा कोन्ही होईल त्याणें झांजियाचे चालवावें. यासि आन करील त्यास अमृतेस्वराची आण असे. मौजे वडगावीची मोकदमी मिरासी करुनु दिधली ते आपले लेकराचे लेकरी खाणें. हा महजर सही.''