Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक १५.

१५९० ज्येष्ठ शुध्द ३

’ ε मसरुल अनाम राजश्री विठोजी हैबतराऊ सिलींबकर देसमुख ता। गुंजनमावल यासि नारो त्रिमळ सु॥ समान सितैन अलफ. तुह्मी जिवाची दहशत धरून बाहेर पडिले आहा. त्यास मागती कौल जालिया वतनावरी येउनु. ह्मणौनु तुमचे बाबे हवालदार ता। मा। मालूम केले जे, देसमुख मा। इळे धास्ती धरून परागंदा जाले आहेती. त्यांच्या पोटाची विले जालिया वतनावरी येतील. येबाबे कौल दिल्हा पाहिजे ह्मणौनु मालूम केले. तरी तुह्मास राजश्री साहेबाचा कौल पहिलेच पाठविला आहे. तो पावला असेल. हाली आमचाहि कौल असे. तुह्मीं कविहाल होऊन आपल्या वतनावरी येणे. वरकड मिरासीदाराची विले जाली आहे, ते च रवेसीने तुमचीहि विले करून तुह्मी बेशक होउनु आमचे भेटीस येणे. येथे आलियावरी राजश्री साहेबाच्या पायावरी घालुनु तुमचा बरेपणाच होये ऐसे करून. तरी तुह्मी कविहाल होउनु येणे. कौल असे. छ १ जिल्हेज पा। हुजूर.''



लेखांक १६.
१५९० फाल्गुन वद्य ९

'' अज रख्तखान राजश्री जिजाबाईसाहेब दाईमदौलत हू ता। विठोजी हैबतराऊ सिलंबकर देसमुख ता। गुंजनमावल सु॥ तिसा सितैन अलफ. तुम्ही व राजश्री गोमाजी नाईक सोईरे जालेती. तुमची कण्या मा। इलेच्या लेकास दिधली. ऐसियास लग्नसिधी करावयाकारणें तुम्हांस व तुमचे मातेस हुजूर बोलाविले. त्यावरून तुम्हीं हुजूर येउनु अर्ज केला जे, सांप्रत आपलियास रोजीचे खावयास नाही. आनी लग्नसिधी कैसी होईल म्हणउनु आपला हवाल सांगितला. त्यावरून तुम्हांवरी मेहरबानी करून लग्नसिधीकारणें तुम्हांस बकसिस दिधले असे. बित॥ आम्ही आपलियापासुनु हजरून

लुगड्याबदल होनु २५J.

सामग्री ऐन जिनस लागेल ते
पांचाशा माणसाची जेवणाची सामान

सदरहूप्रमाणे होनु पंचवीस व ऐन जिनस सामान पांचाशा माणसाचा ऐसे दिधले असे. तुम्हीं सुखे घेउनु अलबता लग्नसिध करणे. कोन्हेबाबें शक न धरणे.
पा। हुजूर.''
तेरीख २२ सौवाल.