Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
त्यास पत्र पाठऊन आणविले ते येण्याचे पुर्वी पेशव्याचा मोड जाला. पुणे घेतले तेव्हा तेथे राहावे तो गोखले याचा निरोप चिटणीसास आला की तुह्मी निघोन माहुलीस येणे कागदपत्र घेऊन दादासाहेब डोणज्याचे खिडीने सिहगडाखालून माझे घराकडून दम खाऊन निघोन जैतापुरास आले नतर प्रधानपत हि माहुलीस आले नतर माहाराजास वासोट्याचे किल्यावर नेणार कळले स्वामीस जैतापुराहून दादासाहेब माहुलीस आले तो माहाराजास किल्यावरून पेशव्यानी माहुलीस आणिले ते वेळी माहाराजाचे हातची हिर्याची आगठी वाहोन गमावली असे वर्तमान कळले नतर स्वामीची व माहाराजाची भेट होऊन पुढे माहुली मुकामाहून विचार करावा तो प्रसग आला नाही स्वामी जैतापुरी च होत तो चिटणीसानी मजबरोबर निरोप पुण्यास साहेबाकडे पाठविला की माहाराजास वासोट्यास नेहणार कसे करावे व हाली तह बिघाड जाहला ह्मणजे बदोबस्त करून माहाराजास राज्य द्यावे असा करार आहे या प्रसगी साहेबानी बच्याव करून माहाराजास राज्य द्यावे आज आपण कराल ते होईल बोललो ह्मणून सदरहू निरोप जैतापुरी स्वामीकडे कळवावयास मुकुदा जमेलकर याजबरोबर पाठऊन मी मला पुण्यास पाठविले मी बाळाजीपत नातुकडे गेलो सदरहू मा।र बाळाजीपतास सागितला परतु त्याणी साहेबास कळवितो बोलले बगल्यास नेहले नाही मग मी दुसरे दिवशी बडेसाहेबाकडे जाऊन परमारे भेटलो त्याणी निरोप ऐकूण खूष होऊन सागितले की आह्मी पलटणेसुधा माहुलीस येणार थोडके दिवसात बदोबस्त होईल माहाराजापासी काही सरमजामाची जमेत असली असता बहुत उपयोग होईल याची तजवीज चिटणीसास सागावी बोलले मी पुण्याहून निघून रस्त्यानी येतो तो बाळासाहेब चिटणीस माहाराज सरकारची खुणेची आगठी घेऊन बोलण्यास गेले ते निंबाच्या पारावर भेटले त्यास सविस्तर मजकूर सागितले नतर मी जातो बोलले सविस्तर मजकूर दादासाहेबास स्वामीस सागावा ह्मणजे माहाराजास कळवितील बोलले व साहेबानी विचारले की माहाराजास च नेणार किंवा आणखी कोण्हास नेणार विचारले नतर मी सागितले की माहाराजास मातुश्री माईसाहेब व आपासाहेब माहाराज व भाऊसाहेब माहाराज राणीसाहेबासुधा नेणार माहुलीस सर्वत्र आणली आहेत अशी बातमी आहे आज उद्या रात्रौ नेणार बोलून मला पाच मोहरा दिल्या त्या आणून स्वामी व चिटणीस विठलपत बाबापासी देऊन सदरहू निरोप माहाराजास विठलपत याकडून कळविला पुढे नतर महाराजसरकारास प्रधान पत घेऊन पढरीस गेले त्या सधीत माझी प्रकृती बिघडली सधीवायु होऊन पाय सुजले सा। घरास गेलो नतर बाजीराव साहेब गेले माहाराजसरकारास इग्रजबाहादूर घेऊन आले त्याकाली श्रीस्वामी व चिटणीसास विठलपतबाबास विनती केली तो स्वामीनी आज्ञा केली की हे राजकारण मोठे याजकरिता तू दाहा वर्षे फार कोणापासी बोलू नये ह्मणोन पेशजी शफत घेतली होती ती विसरलास की काय स्थिर जाहल्यावर बदोबस्त होईल बोलले नतर याजकरिता कसे करावे विचारले बदोबस्त होईल बोलले माहाराजास मुखत्यारी येर्यास पाच वर्षे पाहिजेत सागितले व पाच वर्षानतर माहाराज पाच वर्षे मुखत्यारीने वागू लागतील ते वेळी तुझा बदोबस्त होईल बोलले हे भविष्य सागितले होते च तो बडे साहेब करज्याचे बागेत आले ते काली सर्वांचे ह्मणणे पडले की आह्मी राजकारण केले तेव्हा मी पुण्यास विश्वनाथराव याजबरोबर गेलो होते तेथून मला चिटणीसानी आणविले आणि बडे साहेबापासी भेटविले ते काळी विठलपत बाबा व आमात्यपत व चिटणीस व बाळाजीपत नातू आसे होते साहेबानी विचारले की तू चाकर कोणाचा मग मी उत्तर केले की चाकर चिटणीसाचा चाकरी सरकारची केली आहे ते वेळी मी विनती केली की माझा बदोबस्त करून द्यावा