Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

गाट साहेब यास सागितले की याणी चाकरी फार केली आहे याजकरिता बदोबस्त द्यावा बोलले ते वेळी कोण्हाचे पोटात काय वाकडे आले न कळे माझे बोलणे कोण्ही बोलले नाहीत नतर चिटणीसानी मला आकलकोटास पाठविले तो इकडे ग्राटसाहेब गेले पुढे दादासाहेब स्वामी विठलपतबाबा वारले नतर माझा प्रवेश हि जाहाला नाही व स्वामीनी नेम हि दाहा वर्षाचा सागितला हा। सा। विनती केली नाही पुढे चिटणीस पडित सुमत याणी अकलकोटास सरकारात विनती करून पार तेथे (जाणे मुबईस गेले त्याचे फितुराचे कागद मी सरकार आज्ञेवरून धरिले) हि बड जाले ते वेळी कागद धरिले हुकूम सरकारचा आला त्याप्रमाणे चाकरी केली बडवाले याणी धरून कैद करून बेडी इत्यादि सस्कार केले हे सस्कार पेशजीचे राजकारणात हपत्याची बाकी राहिली होती ती जप्ते याणी केली तेथे चीजवस्तु लुटली गेली त्यानी इजा केली परतु दम न सोडिता पेशजी आपण राजकारणात वागलो स्वामीचे चरणप्रतापे धैर्य व सोडिता बडवाले यासी जबाब दिल्हे ते काळी जानराव शिर्के इकडे च होते असा प्रसग गुजरला हे सर्व सरकारास माहीत आहे च आणि गवताचे लिलाव बेरोजगारी भावानी घेतला असता तो च गुन्हा सिध्द होऊन मला बरतर्फी दिल्ही (व पेशजी सुध्दा या गुन्ह्यात) असो माझे वतन सोडून देऊन मजपासून महाराजानी पायापासी चाकरी घ्यावी मी संकटसमई सेवा केली परतु माझा जिर्णोध्दार जाहला नाही आकलकोट मुकामी श्रीमत राजश्री बाळासाहेब चिटणीस पडित सुमत याणी विनती पेशजीचे राजकारणाची केली त्यावेळी आज्ञा सरकारची जाहली की दुसरे यादीस याचे नाव लिहून ठेवावे ह्मणजे इनाम वगैरे मिळेल हुकूम जाहला व दाजीबा नारोळकर व कृष्णाबाई व दाजीबा उपाध्ये याची रुजुवात हि सरकारानी बळवतराव बक्षी याजकडून करून घेतली नतर चाफळ मु॥ तीथरूप मातुश्री ताईसाहेब व रगोपत दादा व चिटणीस पडित सुमत हि बोलले बदोबस्त करून देतो आज्ञा जाहली परतु मी देव हि जे काही देत नाही व कचा मजकूर हि सरकारात कळला नाही सा। ही अर्जी सरकारानी मनन करून वतन सोडून देऊन मला चरणापासी जागा देऊन चाकरी घ्यावी अकलकोटी धाकटे भावाचे लग्न जाले त्याजबद्दल कर्ज चारसे सवा चारसे जाहले आहे त्यास माझी चीजवस्तु येणे त्यापैकी तीनसे रुपये साहेबानी दिल्हे बाकी येणे ते देण्याचा हुकूम जाहला पाहिजे महा नित्य मुजर्‍यास येण्याची परवानगी जाहली ह्मणजे सधी पाहून वतनप्रकर्णी विनती हि करील मी चाकर सरकारसेवा करण्यास मजकडून अतर होणार नाही परतु मला ही दशा प्राप्‍त जाहली त्यातून काढून माझे सरक्षण करणार माहाराज समर्थ आहेत ही जिकीर सरकारास वाटेल परतु जाले राजकारण कळले पाहिजे सबब विनती लिहिली आहे हे प्रकर्ण बहुत दिवसाचे लिहिण्यात कमजास्त असल्यास माहाराजानी कृपा करावी कारण वेळेचे स्मरण बहुता दिवसामुळे राहिले नाही हाली कोण्ही माझे बोलणे बोलून बदोबस्त करून देवितील असा भरसा वाटत नाही सरकारनी च कृपा करून बदोबस्त करून दिल्यास बदोबस्त होईल नाहीपेक्षा दारिद्रयानी व्यापिले आहे तरी स्वामीनी सेवा घ्यावी सेवेसी शृत होत हे विज्ञापना मि॥ कार्तिज्ञाफ् शु॥ ९ रोज सोमवार शके १७५३

माझी सरकारात वोळख सुध्दा नाही असे जाहले आहे माझे बोलणे स्वामीपासी कोण्ही बोलून बंदोबस्त करून देविवतील असा भरंसा वाटत नाही ह्मणोन विनंती लिहिली सेवेसी शृत होय हे विज्ञप्‍ती