Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

ती किती सागू बोलले मग साहेबास सागितले चिटणीसास आमचा सलाम सागावा आणि नातूस बोलले की तुह्मी जावे उठतेवेळेस बोलले आणि कारकून आला आहे तो येथे असू देणे तुह्मी जावे आमच्या खान्याची वेळ आहे त्याजवरून मला तेथे ठेऊन नातू गेले मग मला विचारले की काय बोलावयाचे आहे ते साग नतर चिठी पायातील सोडून मी काढून दाखविली साहेब बहुत खुष होऊन आछया किया बोलून नतर किल्याचे दरवाज्यास धरले वगैरे जाला मजकूर सागितला हा ऐकून बुकावर माझे नाव लिहून घेतले मजकूर ऐकून पाच मोहरा बक्षिस दिल्या जाणे ह्मणोन सागितले मग मी बोलिलो की मी येथे आल्याची वोळख मजपासी द्यावी बोललो नतर त्याणी इग्रजी आक्षराची चिठी लिहून दिल्ही आणि मतलब सागितला की माहाराजाची चिठी पावली आमची आता खातरी जाहली बोलले व माहाराजाची चिठी हि मागितली ती परत दिल्ही आणि नातूस चिठीचा मजकूर न सागावा त्यास भेटून जावे साहेब बोलले मग मी बोललो की त्यास सागतो की साहेबानी विचारले की स्वामी हे कोण त्यास मी सागितले की माहाराजाचे गुरु त्याणी ऐकून पादरी मात्र बोलले आणि टोपी डोईची काढून सलाम सागितला चिटणिसास हि सागितला व विठलपत कोण हे विचारले नतर मी सागितले की ते फडणीस असे बोलतो साहेबानी ही ओळख बाळाजीपतास देणे जाहल्यास द्यावी नतर बहुत खुष जाहला आणि बोलला की माहाराज सबका धणी आहेत नंतर निरोप घेऊन निघालो चिठ्या तेलात भिजऊन लाखेची गोळी पोकळ युक्तीने करून ती गोळी चुनाळात घालून खाली वर चुना बसवून मग बाळाजीपंत दादाकडे गेलो त्याणी एकीकडे नेऊन विचारिले की साहेबानी आणखी काय तुला पुसिले मग सदरहू मजकूर सागितला नतर निरोप घेऊन येत असता शिरवळचे नदीवर आलो तो तेथे शिपाई याणी आडविले वाटसरू लोकाचे झाड्याबरोबर माझा हि झाडा घेऊ लागले ते वेळेस बालाजी नातू याणी चिठी दिल्ही ती बटव्यात होती झाडा देतेवेळेस आधी जलदी करून तोडात घातली तबाखू खाल्याचा बाहाणा करून चिठी खाऊन झाला दिल्हा तेथून निघोन भिकारीयाचे सोग दाखऊन श्री माहादेवाकडून चाफळास श्रीस्वामी व दादासाहेब चिटणीस व रगोपत दादास भेटलो आणि चिट्या स्वामीपासी देऊन तेथे दोन दिवस राहिलो नतर स्वामीनी व चिटणीसानी चिठ्या ठेऊन घेऊन मला सदरहू मजकूर कळावा याकरिता राजश्री विठलपतबाबाकडे पाठविले सातारियास बाबाचे घरी सध्याकाळी येऊन भेटलो सविस्तर जाहाला मजकूर सागितला ऐकून सतोषी होऊन मला पोटासी धरले फार मेहनत केली बोलून जाला मजकूर सर्व माहाराजास कळवावा मी बोललो नतर तात्या नारोळकर व दाजीबा उपाध्ये यास बोलाऊन आणून कचा मजकूर सागून किल्यावर सरकाराकडे पाठविले नंतर त्याचे बरोबर माहाराजाची आज्ञा निरोप आला की चिटणीस वगैरे पुरातन सरकारपदरचे या समई सेवा करून दाखवावी परतु आपला बचाव करून करणे ते करावे व स्वामीस ही विनती करावी की श्रीची प्रार्थना करावी याप्रमाणे श्रीमत मातुश्री माईसाहेब व माहाराज बोलले कोबाड यासी पडला हे पेशजी केले च आसेल हाली आह्मापासी राजकारण प्रकर्णी काही कागद साधनी वगैरे होते ते कागद आह्मास आदेशा येऊन सारे खोलीस एकीकडे बसून जाळून पाणी करून टाकिले अशी अडचण आहे तरी जपून अगावर न येता सावधगिरीने जे करणे ते करावे