Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३२३
श्री छत्रपति
अर्जी चरणरज रगो बापूजी चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना ऐसी जे -- मजकडून चाकरी अवल इग्रजीत राजकारणी झाली ती तपसीलवार विनति माहाराजाचे चरणी श्रुत व्हावयास लिहिली आहे स्वामी माहाराजानी मनन केली पाहिजे शके १७३६ या सालात श्रीस्वामी चाफळाहून बोरगावास श्रीमत राजश्री मल्हारराव दादासाहेब व बाळासाहेब चिटणीस याचे भेटीस आले नतर विचार, केला की, श्रीमन्महाराज राजश्री स्वामी यास बाजीराव रघुनाथ प्रधान याणी किले सातारा येथे ठेऊन बदोबस्तास काशीपत बापरे वगैरे ठेविले आहेत, तेथे अडचण फार आहे, परतु काही राजकारण इग्रजबहादूर याजकडून अल्पिष्टन साहेब पुण्यात वकिलीचे कामावर आहेत त्याजकडे प्रवेश करून हा सविस्तर मजकूर कळवून काही उपयोग होई आणि महाराजास मोकळे करून देऊन दौलत सर्व हातास येई ऐसी तजवीज करावी मग श्रीस्वामीनी श्रीदेवास प्रार्थना करून, मसलत करावी सिध्द होईल असे ठरून, त्रिवर्गानी (रगोपत, दादाजी) विचार करून, मला पुण्यास पाठवावे असा विचार करून तीर्थरूप श्रीस्वामीनी मला अनुग्रह देऊन, पायावर हात ठेऊन घेऊन, ही चाकरी सागितली त्या काळी मी विनति केली की, माझे वतन ता। रोहिडखोरे एथील देशकुळकर्णाचे वगैरे पेशजी कैलासवासी राजारामसाहेब महाराज याचे कारकीर्दीस जबरदस्तीने सचिवपत याणी घेतले व गावकुलकर्ण लोहकर वगैरे गुमस्ते याणी घेतले त्याजबदल तटा कैलासवासी शाहूमहाराजाचे कारकीर्दीत जाहाला, ते वेळीची कागदपत्रे वगैरे साधनी काही कागद मजजवळ आहेत ते पाहावे, माझे वडील दत्तक दादाजी प्रभु नरसप्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी ता। मा। याणी गोत्रपुरुष ता। वेळवडखोरे ऐथील दादाजी प्रभु आणून, चौघाचे साक्षीने, दत्तक घेतला पुढे दादाजी प्रभु वतनाचा भोगवटा करीत असता सचिवपतानी जबरीने अफलादीचा वश ह्मणोन कागद लेहून घेऊन वतन घेतले तरी या मसलतीस यश आल्यावर माझे वतन मज मिळावे या वतनानिमित्य रामाजीबावा, माझे आजे, पेशवे याजकडे फिर्याद गेले ते वेळी पाणपतावर जावयास निघाले ते काळी त्यानी सागितले की, तुह्मी बराबर चलावे ही मसलत जालियावर तुमचे वतन पताकडून देववू पुढे पाणपतावर तिकडे च गर्दीत मारले गेले पुढे वाद तसा च राहिला सचिवपत जबरदस्त, विलाज चालत नाही त्यास हाली आपण मनावर घेऊन वतन देवावे बरे बोलून वचन दिल्हे की, तुझे वतन माहाराज खाली एऊन राज्य करू लागल्यावर सोडून देऊ तो इतक्यात पुण्याहून चितोपत देशमुख, पेशवे याचे कारभारी, याचे पत्र चिटणिसास बोरगावीं आले की वाडीवर सावत याचे बोलणे इग्रज याजपासी पडले आहे की, आह्मी चाकर पेशव्याचे नव्हे, आमची दौलत निराळी, त्यास त्याचे साधनी कागद असतील ते घेऊन यावे, एविसी परवानगी श्रीमत याची आहे त्यावरून दादासाहेब निघून पुण्यास गेले. बरोबर मला हि नेले तेथे जाऊन देशमुखाकडून श्रीमताची भेटी घेतली.