Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

ती चिठी मी सातारियात येऊन श्री मगलाईचे देवीचे दर्शनास जातो ह्मणून मजकुरी किल्यावर चौकीदारास सागून गेलो तेथे चिठी तात्या उपाध्ये नारोळकर याजपासी दिल्ही नतर माहाराजापासून सरकार चिठी त्याणी आणून मजपासी दिल्ही ती चिठी खाली येण्याबद्दल पायास कुतरे चावले असा बाहाणा करून पायास भोक पाडून जखम करून रक्त न पुसता व ता। चुना लाऊन काही झाडपाल्याची पेड पायावर बाधून ती चिठी खाली आणीत असता कासीपत बेदरशहराहून किल्यावर येता तो माझी दरवाज्यास गाठ पडली त्याणी दरवाजेवाले यास शिव्यागाळी देऊन हा गोसावी कोठून आला आणि कोठे जातो विचारून झाडा घेऊ बोलला की हा फितुरी आहे गोसावी नव्हे बोलून पाहर्‍यात ठेविले आणि वरत गेले तेथे जाऊन कारकून पाठऊन झाडा आणखी आपले रुबरु घेतला आसता पुन्हा घेऊन जरब जाऊन चौकसी केली नतर डोलच्या वाड्यात पाठविले तेथे हि चौकशी केली परतु काही ठिकाण लागले नाही सबब चिचेच्या फोका आणून मारतो बोलून बेडी हि आणू अशी जरब दिल्ही परतु कोणाचे नाव न घेता काही कबूल जाला नाही तो हे वर्तमान जैतापुरास राजश्री विठलपत बाबाजीस सागून पाठविले वर्तमान कळता च श्री स्वामी व चिटणीस व रगोपत दादा स्नान भोजन टाकून दोन दिवस एक जाग्यास विचार करीत बसले तो तेथे मी काहीच ठिकाण लागू न देता पाहर्‍यात होतो मग दुसरे दिवशी गोसावी भिकारी याजपासी काही नाही वेडा आहे ह्मणोन सोडून दिल्हे नतर मी माहुलीहून जराड्याचे डोगराकडून सध्याकाळी जैतापुरी रात्री जाऊन स्वामीस व चिटणीसास व रगोपतास भेटलो नतर स्वामीनी मला पोटासी धरून नेत्रातून पाणी आगावर टाकिले फार श्रमी सर्वत्र जाहले आणि बोलिले की आज कासीपतानी चिचेच्या फोका व बेडी वगैरे जरब देणे ती दिल्ही परतु तू कोणाचे नाव न घेता सर्वांचा बचाव केलास व माहाराजाची हातची चिठी पायाचे मणगटास बाधून आपली ही गोष्ट श्रीनी मोठी केली बर माहाराजाचे पायास तू मळ लाविला नाहीस मोठे सकटातून पार पाडिलेस नाहीपेक्षा प्राण चिटणीसानी व आह्मी व ज्याची नावे कळती त्याणी देणे आला होता विठलपंतबाबा इत्यादि तू आज वाचविलेस बोलून ये वेळेस बक्षिस तुला काय द्यावे बोलले मग मी उत्तर केले की मला वतन सचिवपताकडून घेऊन देतो ह्मणोन पेशजी वचन दिल्हे ते सोडून देण्याचे वचन आपण व चिटणीस व बाबाजी दिल्हे त्याप्रमाणे कार्य सिध्दि जाहलीयावर द्यावे नतर श्रीस्वामीनी श्रीरामाची पुजा करतेवेळी शफत वाहून तुळसी देवावरी दिल्या आणि सागितले की हे वचन आज माहाराजानी च दिल्हे असे समज हे वचन माहाराज चालवितील तुझे वतन हरप्रयत्‍न घेऊन देऊ बोलले व चिटणीसाकडून व बाबाकडून हि वचन रगोपत दादाचे साक्षीने देविले नतर पुण्यास बडे साहेबाकडे पाठविले बाळाजीपत नातू याजकडे जाऊन भेटले तेथे चिठीचा मजकूर कळऊ नये साहेबास मात्र कळवावा असे सागितले होते साहेबाचा चपराशी वोळखीचा पेशजीचा होता त्याजकडून आधी साहेबास सागितले की नातू गेल्यावर मागे मला ठेवावे मला मात बोलावयाची आहे सागून ठेऊन मग बाळाजीपत दादाबरोबर जाऊन गारपिरावर भेटलो आणि निरोप सांगितला की माहाराजास फार आडचण केली आहे