Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)

वाडीकर सावताचा तहनामा दाखविला नतर श्रीमतानी बडेसाहेबास दाखविला त्याणीं विचारिले कीं, आजपावेतो हा कागद निघाला नाही, हालीं कोठून निघाला. मग त्याणी सागितले की, माहाराजाकडील चिटणीस याजपासी होता तो त्याजकडून आणविला नतर हा मजकूर चितोपत रावजी देशमुख याजपासी कळला तो सविस्तर चिटणीसापासी सागितला नतर साहेबाची भेट होऊन वोळख करावी ही तजवीज देशमुख याजपासी विचारिली, त्याणी सागितले की, बाबाजी आगरे याजकडील कारभारी याचे येथे साहेबाचा येण्याचा पाठ आहे व बाळाजीपत नातू हि त्याजकडे च आहेत नतर बाबाजी आगरे याजकडे च जाऊन त्यासी विचार करून साहेबाची भेट घेतली तेथे मला बरोबर नेऊन, आगरे याजकडील कारभारी यास न कळतां, साहेबाची रुजुवात करून दिल्हशी साहेबानी विचारिलें की, माहाराजसरकारांनीं पेशव्यांस दौलत कशी दिल्ही व कोण्ही कोण्ही दौलतदार वगैरे महाराजापासी राहून चाकरी कसी केली हे सविस्तर आह्मास कसे कळेल ? नंतर चिटणिसांनी सागितले की, साहेबानी हा मजकूर श्रीमतास विचारावा, मग त्याणीं आह्मास सागितल्यावर सविस्तर मजकूर कैलासवासी शिवाजी महाराज याचे कारकीर्दीपासनू प्रकर्णे लिहून त्यांस देऊ नतर साहेब यानी श्रीमतास हा मजकूर विचारून, बखर लिहून आणवावी, सांगितले त्याजवरून पुणे मुकामीं च दादासाहेब चिटणिसानीं बखर तयार करून दिल्ही त्या निमित्य त्यानी मला गारपिरावर बगल्यास पाठविले निरोप सागितला की पेशवे याजकडून महाराजास किल्ल्यावर फार अडचण होती, ते धणी व बाजीराव हे महाराजाचे चाकर असता असे होते तो त्याणी सागितले की, हे राजकारण तुह्मी महाराजास कळवून करता किंवा कसे ? मग परत मी चिटणिसास सागितलें त्यानी सागून पाठविलें की, महाराजास किल्यावर फार अडचण, त्याचे दर्शन होणे फार कठिण आहे त्याजवर साहेबानी सागितलें की, हर प्रयत्ने तयास कळवून करणे ते करावे नतर दादासाहेब चिटणीस जैतापुरी एऊन, तीर्थरूप श्रीस्वामीस बोलावणे चाफळास पाठऊन, आणविले जाला मजकूर सागितला मग विचार करून राजश्री रगोपतदादा यास पाठवून राजश्री विठलपत बाबा व दाजीबा उपाध्ये व सेटिबा देवपूजे याचा विचार घेऊन, किल्यावर जाणार येणार कोण याची माहिती पुसून, तात्या नारोळकर वैद्य व कृष्णाबाई व नरसू काकडे व खडेराव महाराजे शिर्के, असे जातात येतात कळले त्यासी बोलून सिध्दात केला आणि एक निरोप सदरहू राजकारण इग्रजाकडे करितो असा तात्या नारोळकर याजबरोबर किल्यावर सरकारकडे पाठविला आणि सदरहू सातार मुकामी मडिळीची वोळख रगो बापूजीस जाली पाहिजे ह्मणोन रगोपत दादास बरोबर घेऊन सदरहू मडळीची रुजवात करून दिल्ही आणि दाजीबा उपाध्ये व तात्या नारोळकर याजपासी सागितले की रगोबा उद्या पाठवितो तुह्मी आज सध्याकाळी किल्यावर जाऊन सदरहू मजकूराची सूचना माहाराजास करून ठेवावी आणि माहाराजाचे हतची चिठी रगोबापासी साहेबास वोळख पटण्यास द्यावी तशी तजवीज करावी सागून रगोपत परत गेले रगोबास फार असे बोलले मला श्रीस्वामीनी आपली झोळी देऊन गोसावी करून चिठी द्यावी अशी चिठी लिहून दिल्ही