Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
कि॥ कलम सेत माहादजी पाटेल दि॥ वाटेकरी पिकले सेत हरजिनसी बिघे ५० मौजे कोणेगव्हाणे खासा माहादजी पा। ५० मौजे सीवडे बा। वाटेकरी --------- १०० ए॥ बिघे एकसे पैकी बा। कोणेगव्हाणे येथील पन्नास बिघे सटवोजी भोसलियानी गुरे व सेरडे घालोन चारिले व बा। सिरवडे बिघे पन्नास काही मालिस्त करून नेले व काहीं गुराकडून चारिले ह्मणोन माहादजी पा। याणी विदित केले यास सटवोजी भोसले यास यास विचारिता हृवदित केले की दहा वीस बिघे आपले गुरानी खादले असेल ह्मणोन तकरीर केली यासि निर्वाह केला की देशाधिकारी व पारपत्यगार ता। मा।र यास आज्ञापत्र सादर करावे की सटवोजी भोसले याणी माहादजी पाटेलाचे सेत देखील वाटेकरी सदर्हू सेभरा बिघियामधे चारिले किती व मालिस्त करून नेले किती हे देसमुख देसकुळकर्णी व मौजे मजकूरचे वतनदार व भले लोक ग्वाही साक्ष असतील याला सफतपूर्वक आळस व कोससि न करिता बरे चौकस मनास आणोन गाहीसाक्षीने सेभरा बिघियापैकी सटवोजी भोसलियाकडे मोझ्या मुकाबलियाने शाबीत होईल याची बेरीज जे हक्कहिसाबी होईल ते तपसीलवार बखेर सिकियानसी व ग्वाहीदाराचे साक्षीनसी साक्षपत्र हुजूर पाठवणे सदर्हू कलमास ग्वाहीसाक्ष मनास आणाल ते ऐसी मनास आणने की सदर्हू कलमाचा निर्वाह होय आण बदलामी न ये ऐसी परनिस्ट साक्ष मनास आणोन हुजूर लिहिणे एकूण कलम १ |
कि॥ कलम माहादजी पा। याची पाचा यासि निर्वाह देशाधिकारी व पारपत्यगार |