Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३१७. 

१७१९ फाल्गुन वद्य ६.

छ ७ सवाल चैत्र मास सुहूर-सन समान तिसैन मया व अलफ.
साहेबाचे सेवेसी पुरवणी त॥ छ १९ रोजीं सेना-धुरंधर यांनीं समारंभ दिवाणखाण्यांत करून सर्व मुछद्दी मंडळी व मानकर वगैरे यांसी बोलाऊन राजश्री भवानी माळो व त्याची मंडळी बळवंतराव भवानी सुध्धां श्रीधर लक्ष्मण रामचंद्र माधव कृष्णराव माधव माधव अनंदराव वैद्य व नेमतराव कायत शिंद्याक डील व केशवराव व्येंकटेश होळकारा-कडील वकील व नरशिंगराव अनंत नबाबा-कडील बुऱ्हानशाचे चिरंजीव असामी दोन गुजर मंडळी व्याही जावई व भासे वगैरे मिळोन पाऊणशें इसम यांसी वस्त्रें शेला पागुटीं योग्यायोग्य पाहून बराणपूर ज्याहनाबाद येणेप्रे॥ दोन सनगें सर्वांस देऊन राजश्री परसोजी भोसले यासी शेला पागुटें पैठणी अबासी दिल्हे व मुधोजी भोसले यांसी कुंचडेंटोपडें झगा दिल्हा बादलीपोशाख दिल्हा राजश्री सेनासाहेब सुभे यांसी बसंती वर्खी कच्या रंगाचे सेलापागुटें दिल्हें नंतर अत्तरदान पानदान गुलाब होऊन सेनासाहेब सुभे यांनीं आपल्याकडून वर्खी कच्या रंगाचा पोशाख दिल्हा सर्वांस निरोप दिल्हा. साहेबाचे सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.