Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३१४. 

१७१४ आश्विन शुद्ध १.

राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री त्रिंबकरावजी स्वामीचे शेवेसी:-
पो। बाळाजी रामचंद्र सांवरकर कृतानेक स॥ नमस्कार विज्ञापना. येथील कुशल त॥ आश्विन शु॥ १ मु॥ जनस्थान जाणून स्वकीयार्थ लिहीत असले पाहिजे. कृपा करून पत्र पाठविलें तें सुसमयीं प्रविष्ट होऊन परमानंद जाला. परंतु स्वकीय प्रकृतीचा मजकूर कांहीं लिहिला च नाहीं व राजश्री खंडेराव दादाजीस सरदारीची वस्त्रें जालीं म्हणोन येथें दाट खबर ऐकतों, त्याचें हि कांहीं लि॥ नाहीं. या खेरीज राजश्री भिकाजी मोरेश्वर यांची जप्ती मोकळी जाली म्हणोन येथें त्यांनी वदंता घातली आहे. हें हि कांहीं समजलियांत येत नाहीं त्यास कृपा करून आप्त जाणोन सर्व म॥र लेखनीं कळविला पाहिजे. यानंतर राजश्री लक्ष्मणपंत लेले यांचा मार लि॥ यास मारनिलेस मी निघालीयाचे पाठीमागें ज्वर जाला त्याजमुळें त्यास कोणाची फुकट घोड्याची सोबत लागतांच आपला निरोप देखील न घेतां गंगापुरास आले. येथें आलियावर हि मला समजलें नाहीं. आतां समजलें. येथें येऊन हि बरें वाटत नाहीं. असो. परंतु आपला तर निरोप घ्यावयाचा होता ? अशाच्यानें कामें जर होतीं तर नोकर पृथ्वीवर कोणीच न राहाते. राजश्री धोंडोबा नाईक रेघे यांस साडेचौशाविशीं तगादा केला. ते समयीं बोलले कीं, देतों. त्यास वायदा केला. त्याजवर फिरोन बदलले कीं, रावजीचें पत्र कोठें आलें ? त्याजवरून शिपाई बसविले. इतकियांत आपलें पत्र आलें कीं, सव्याज रुपये घ्यावे. हें त्यांस दाखविलें. तेव्हां प्रयत्नानें वाटेवर येऊन आजचा च वायदा केला आहे. हे रु।। आज्ञे प्रों। सध्याज घेतों. परंतु पुढील रुपयाविशीं तंटा पडलेसें दिसतें. तगादा सख्त करीतच आहों. हे रुपये वसूल साडेच्यारशें जालियावर दिंडोरकर देशमुखास तगादा करितो; कळावें. धोत्रजोडे बेता प्रों।। तयार करविले आहेत. पीतांबराचा माग्या गांवास आमचे वोळखीचा गेला आहे. एका दोहों दिवशीं आलियावर तो हि उद्योग होईल. मध कोणी प्रमाणीकसा जासुद येऊं लागला म्हणजे जरूर पाठवितों. रा।। मोरोपंत भाऊ दसरियास यावेसें केलें होतें, परंतु येथें ऐकिलें कीं, रा।। दादाजीस वस्त्रें सरदारीचीं जाली. त्याजवरून दीपवाळी करून निघावें ऐसें केलें आहे. मी हि शेवेसीं समागमें येतों. आतां पुणियांत येण्यास भरंवसा एक आपले पायाचा वाटतो. तेणेंकरून वारंवार दर्शनापेक्षा होते. भेट होय तो सुदिन आहे. रा। भाऊजी र॥ दादाजीस व आपल्यास पत्र लि॥ आहे. याचे त्याजकडील मी हि त्यांस पत्र लि॥ आहे. त्या सुद्धां उत्तरें घेऊन प॥. त्यांचे उत्तर आणवावें म्हणोन रा। भाऊंनीं आपलियास लिहावयास सांगितलें आहे. शेवेसी श्रुत होय. दयावृद्धि करीत च आहेत. तसी निरंतर करावी. हे विज्ञप्ति. र॥ विनायकपंतास नमस्कार प्र॥ करावे.