Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीसर्वेश्वर.

लेखांक ३१३. 

पैवस्ती श्रावण व॥ १३ शके १७१४ परिधावी संवत्सरे.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री त्र्यंबकरावजी स्वामीचे सेवेसी
सेवक मोरो त्र्यंबक गोडबोले कृतानेक स॥ नमस्कार विनंति. येथील कुशल त॥ श्रावण वद्य ३ त्रितिया पर्यंत जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. आपण एकदोन पत्रें विस्तारें लिहिलीं तीं पावोन सविस्तर कुशलार्थ कळले. चिठी यजमानाकडे द्यावयाची ती बराबर गेली असेल. कामास अडथळा पडला याजमुळे दुसरी दिली म्हणोन लि॥ त्यास चिठी आम्हांबराबर आलीं नाहीं. यजमानाजवळ प्रविष्ट जाली आहे. खासगीकडे शोध करावा. थांग न च लागला तर दुसरी चिठी आपण दिली असेल तिजमध्यें पहिली चिठीचा आशय आणिला असेलच. त्यापक्षीं चिंता नाहीं सरकारचे ऐवजाच्या मुदती-भरत आल्या म्हणोन घोरांत आहों ऐसें विस्तारें लिहिलें त्यास जे वेळेस करार जाला ते समयीं गावचा वगैरे एकदम फडशा करावा ऐसा विचार करून च आपण कबूल केलें ऐसी गोष्ट जाली च आहे त्याजप्रमाणें पैरवी करून भरणा करावा. वचनांत करारांत अंतर पडलें तर पुढें विशेष कृपा संपादून घ्यावयाची त्यांस वाकडें पडेल याजकरितां रावजी करारसमयीं विचार करून जो नेम केला त्याजप्रमाणें पार पाडावें घर मोकळे करून घ्यावयाचें तें जें चित्तांत होतें तें च सुटलें तेणें करून बहुत संतोष जाला. यजमानास पत्र द्यावें म्हणोन लिहिलें त्यास करार आहे त्यांत कोठें गुंतले- यास कानावर पडलें म्हणजे ते क्षणीं च उलगडा पडतो. ऐसे कृपेचा प्रकार आपण लिहिला त्या पक्षीं उगेंच पत्र ल्याहावें ऐसी रीत नव्हे, म्हणोन लिहिलं नाहीं. कळावें. बहुत काय लिहिणें? कृपा लोभ करावा. हे विनंति.