Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ३११. 

१७१४ श्रावण.

विनंती विशेष. राजश्री मोरोपंत भाऊ आम्ही मेजवानीस बोलाविले होते. आपली गोष्ट श्रीमंताजवळ निघाली ते सहजात येथें काहाडली होती. तदनंतर असें हि बोलले कीं राजश्री बालाजीपंत सावरकर याजवर हि कृपा बहुत करितात. आम्ही जनस्थानीं गेलों तें समई बालाजीपंत यास उद्योगाकरितां राहून घेतलें. राजश्री खंडेरावजी याचें बरें व्हावें म्हणोन उद्योग केला. त्याचें फल आतां असावें त्यावरून मीं बोललों कीं ते ममता करितात यांत बाळाजीपंताचें उर्जित करण्यास अगाध नाहीं. ते थोर. त्यांणीं सहज यांजकडे बरें दृष्टीनें अवलोकन केल्यास कूर्मबालकापरी यांचे कल्याण होईल. जें आपलें म्हणविलें त्याचे चालवावें हे थोराचें लक्षण. यास्तव बाळाजीपंत कुलीण. थोर शहाणपणाची जात. अनुभवजन्य आहे. आपली दौलत थोर. संग्रह मनुष्यांचा असावा. श्रीमंत नानासाहेबी जो मनुष्य गुणी आढळला, स्वराज्य परराज्यांतील, तो संग्रहोन ठेविला. बाळाजीपंत बुध्दीमान आहेत. याचा संग्रह आपल्याजवळ ऐसे भाऊचें हि मानस. त्यांत जे समईं मारनिल्हेस हातीं धरून सांगितलें कीं आमचें कल्याणाविसीं आम्हांजवळ असावें. त्यास थोरांनीं ज्यास हातीं धरलें त्याचे अभिमानपुरस्कार चालवितील च ते च आपण कोणे समईं कोणी येक वस्तु संग्रहीं काय गुण. हे सुज्ञ सुक्ष्म दृष्टीनें अवलोकितात. मारनिल्हेस नेमणूक त्या समयानरूप खर्चाची चालती करून आपले पदरीं ठेविलें असतां याचा हि पायगुण आपल्यास अनभवलाच आहे.