Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीसर्वेश्वर.
लेखांक ३१२.
१७१४ श्रावण वद्य ३.
पैवस्ती श्रावण व॥ १३ शके १७१४ परिधावी.
राजश्री त्र्यंबकरावजी स्वामीचे शेवेसी:-
विनंति. राजश्री त्र्यंबकरावजीस पत्र आपलें लिहिल्यावरून पाठविलें आहे. ते कृपा करीतच आहेत. राजश्री बळवंतराव सावरकर यांस पत्रें आमचे लाखोट्यांत होतीं तीं पावती केलीं. त्यांनीं उत्तरें दिली आहेत. पावतील. आमचे येण्याचा योग कधीं म्हणोन लिहिलें त्यास चातर्मास जालियावर विचार करावयाचा आहे. तुम्हीं फार सावधपणें वर्तणें. व मर्जी संपादन युक्तीनें करून घ्यावें. दर्शनास जात च असाल. सारांश प्रमाणीकतेची आवड यजमानास फार आहे. आपण हि तसेंच आहां. कसें वर्तावें हें ल्याहावें म्हणोन लि॥ त्यावरून लि॥ आहे. विशेष ल्याहावें नलगे. निरंतर वरचेवर होईल तें कळवाल. तेणें करून संतोष असे. बहुत काय लिहिणें ? तीर्थस्वरूप राजश्री बाजीपंत दादा काकिडर्यस स॥ नमस्कार आपण जाऊन सांगावें त्याकडे आठा चोहों रोजीं जात जावें. समागम योग्य आहे. लोभ करावा. हे विनंति.
सेवेसी रामाजी केशव पळनीटकर कृतानेक स॥ नमस्कार. विनंति. येथील क्षेमश्रावण वद्य ३ पर्यंत जाणोन स्वकीय कुशललेखन करीत असावें. विशेष. आपण दोन पत्रें पाठविलीं तीं पावोन कुशलार्थ कळला. आपले पत्राचे अर्थे राजश्री भाऊसी बोलोन उत्तरें पाठविलीं आहेत, त्याजवरून सर्व अर्थ ध्यानांत येईल. सर्वदा पत्र पाठवून सांभाळीत असावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.