Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०९.
नकल
१७११ कार्तिक शुद्ध ७.
राजश्री राघो विश्वनाथ गोसावी यांसि:-
सुमा तिसैन मया व अलफ. दुल्लभशेट गोविंदजी यांनीं पेठ रविवार शहर पुणें येथें श्री गोपालकृष्णाचा ठाकुरद्वारा केला आहे. तेथें शेजारीं चांभारांची छपरें आहेत. त्यास दुसरेकडे ठेवावे तरी त्यास जागा पाहिजे. याजकरितां त्यांचे दक्षणेस शेजारीं छटु फरासाची जागा सरकारांत जप्तीस आहे ती मजला देवावी. मी त्यांस देऊन त्यांची जागा ठाकुरद्वाराकडे घेईन. सरकारचे जाग्याचे मोबादला माझी जागा पेठमारीं आहे तीं सरकारांत घ्यावीं म्हणोन विनंति केली त्याजवरून शेटीची जागा पेठमारीं लांबी हात २३ व रुंदी हात १४ त्यांत इमला अजमासें अडीचशें रुपयांचा आहे. ती सरकारांत घेऊन मोबादला छटू फरासाची जागा चांभाराचे लगती दक्षणेंस सरकारांत जफ्तीस आहे ते लांबी हात ३० व रुंदी हात २६ त्यांत इमला अजमासें रु।। शंभराचा आहे ती जागा सेटी मार यांस देणें छ ५ सफर बार कीर्दीस आहे.