Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ३०७.
नकल
१७१० ज्येष्ठ शुद्ध १०.
राजश्री दुलभशेट गोविंदजी मु॥ के॥ पुणे गोसावी यांसी :-
छटु फुरास याची बायको खानम तुह्मांस हें बेदावेपत्र लेहून दिल्हे कारण ऐसें जे :-
आमचा भर्तार छटू फरास श्रीमंत नारायणराव साहेब यांच्या दंग्यांत सरकारचे गुनेगारींत आला; सबब मजला चाकणचे किल्यांत मुलाबालासुधा कैदेंत ठेविले. भर्तार श्रींमत दादासाहेबांबराबर होता. तिकडे मयत झाला. साडेतीन वर्षे मी कैदेंत होतो. त्यास सन समान सबैनांत तुह्मी सरकारांत विनंती करून माझा खंड ठराविला रुपये ३०० तीनशे; आणि आदितवार पेठेंत आमचे कामाठी महल्यांत खपरेल अकरा खण सरकारांत जफ्ती होते, त्यापैकी साहा खण सरकारांतून मजल बक्षीस राहावयास दिल्हे. त्याची सरकारची चीटी घेतली. त्याजवर सरकार खर्च वगैरे खर्च पडला; तो मजपासी द्यावयास नाहीं. तेव्हां सदरहू सहा खण तुह्मांकडे गाहाण ठविलें त्याचें गहाणपत्र पेठ म॥रचे चावडीवर आमचा जातवाला दाऊदभाई याचे साक्षीनें लेहून देऊन तुह्मांकडून सरकारचे रु॥ देविले. व खर्चाचे रोख घेऊन दिल्हे. त्याजवर घरांत भाडेकरी घातला आणि भाड्याचे दहावीस रुपये आले, ते तुह्मांस दिल्हे. पुढें तुमचे रुपये व्याजसुधां देऊन खण सोडवावें त्यास, आपली नादारी, अन्न भक्षावयास नाहीं, आणि भाडेकरी कोणी राहीना. अशांत बाहादरखान गाडदी सरकार आज्ञा घेऊन जबरदस्तीनें येऊन घरांत राहिला. भाडें पैसा येईना. त्याजवर मा।। पोरेबालें मेली. अन्नासाठी खेडेगांवी जाऊन राहिलें. त्याजवर तुह्मीं गहाणवटाची हकीकत व पत्रें सरकारांत दाखऊन परवानगी घेऊन मोठया सस्तीनें बाहादरखानास घरांतून काढून खण साहा आपले कबजेत ठेविले; त्यास वरीस दीढ वरीस जाहाले. हालीं केवळ नादार, अन्नवस्त्र नाहीं, म्हणोन फते- महमद वल्लद शेख महमद व फते-आली वल्लद मिरजा मोमीन बेग दि॥ चाकर तोफखाना यांस घेऊन तुम्हांकडे आलें का सदरहू खण तुम्हांकडे आहेत ते तुम्हास बेदावाखत लेहून देतें आणि मजला साहा च्यार महिने अन्न पोटास द्यावें. त्यास तुम्हीं उतर केलें कीं, तुजला सोडविली, पदरचा पैका दिल्हा, त्यास दाहा वर्षें गुजरलीं, पैशास ठिकाण नाहीं, घर बाहादरखान यांणीं घेतले होते ते आम्हीं जबरदस्तीनें सोडविलें, त्यास व्याजसुधां पैका देऊन सोडवावें, निदान जें तुझ्या खातरेस येईल ते व्याज व मुद्दल देऊन आपला जागा घर चित्तास येईल त्यास विकणें, अथवा गहाण ठेवणें, आणि पैका देणें, आपले सोईचे घर नाहीं. म्हणोन बहुत प्रकारें सांगितलें. परंतु त्या घरास कोणी खरीददार होत नाहीं, आणि माझ्यानें गहाण ठेविल्यास कोणी ठेवीत नाहीं. मी आपले खुश-रजाबंदीनें तुम्हांस बेदावा लेहून दिल्हा आहे. तर आगवाडा पिछवाडा पूर्वेकडील रिकामा जागा व बांधलेला इमलासुधां साहाखण तुम्हाकडे गाहाण होतें तें तुम्हांस खंडून तुमच्या ऐवजांत दिल्हें. मागेंपुढें कोणी या खणाविशईं वाद सांगावयाचा सबंध राहिला नाहीं. मिती शके १७१० कीलकनाम संवछरे जेट वा ७ वार बुधवार सु॥ तिसा समासीन मया व अलफ. हस्तअक्षर महिपत मल्हार महाजन पेठ भातखळें सरकार जुन्नर
सदरहू निशाणी पांच बोटें करंगळीनें खानम छटु फरास याचे बायकोनें केली.
साक्ष
१ फते महमद वलद शेख महमद दि॥ तोफखाना असामी जेजालंदाज खानमचा जांवई यांनीं रुबरु साक्ष ल्याहावयास सांगितली कीं सदरहू घराचा बेदाबा आपण मध्यस्ती करून केला असे. हस्ताक्षर लक्ष्मण फटकाळे वर लिहिलेप्रमाणें खानम यास पुसोन लिहिलें असे.
निशाणी शेख-अदम खानमचा पालक लेक याची पारसी असे.
साक्ष भत्य आलीबेग वलद मीरजा मोमीनबेग दि॥ तोफखाना. आपण मध्यस्ती करून बेदाबा करून दिल्हा असे हस्ताक्षर सदाशिव वाईच नि॥ घोले मंगलवाडेकर.
निशाणी नांगर.
१ पत्रप्रों। साक्ष सखाराम धोंडाजी. उभयता धणी रुजू.
१ पत्राप्रों। मनोहर अनंत किरकसे. उभयतां धणी रुबरु.
१ पत्राप्रों। साक्ष नंदापा वाळेकर दोघे धनी रुबरु.
१ शादतराम मोतीचंद शाखधणी बोई हजूर.
साक्ष जोत्या नष्टे.
---------------दोघे
धणी उरुबुरु.