Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीह्माळसाकांत.

लेखांक २४१.


छ० १५ रोबल

१६९६ वैशाख शुद्ध ४.

विज्ञापना येथील वर्तमान ता।। छ २ रावल मु॥ अवंतिकापुर येथास्थित असे. विशेष. येथील मजकुराचीं कलमें येणेंप्रमाणें.

चिमाजी नारायेण याच्या वाड्यांत रहावयास जागा दिल्ही आहे. कुशाबा हि पहिल्यापासून याच वाड्यात रहात होते त्या प्रें॥ दुसरी जागा निकालस येथें मिळणार नाहीं. क्षिप्रेचे उदक समीप व देव हि समीप यास्तव सर्वांच्या विच्यारें येथें रहावें असे ठरलें त्याजवरून येथें राहिलों. घोड्याची सोय वाड्यांतच जाली आहे. पालखीस व उंटास मात्र जागा येथें नाहीं. त्याजला दुसरे ठिकाणीं जागा करून दिल्ही आहे. जाग्याची बेगमी जाली आहे. चिंता नाहीं. कलम १.

राजश्री बजाजीपंत नि॥ पाटीलबावा याजकडून हजार रुपये येणें त्याजप्रों।। बऱ्हाणपुरचे मुकामीं तिनसे रुपये घेतले व येथें तीनसे येकूण सा शे रुपये घेतले. बाकी च्यार से राहिले. ते हि येका दो रोजांनीं देतों म्हणोन म॥रनिलेंनीं मान्य केलें आहे. यासिवाय खर्चास लागल्यास मी देईन. तुम्हीं कोण्हेविसीं चिंता न करावी म्हणोन आमची खातरजमा केली आहे. पीरखान हि वरचेवर समाचार घेत असतो त्याणें हि सांगितलें आहे कीं दोन च्यार हजार रुपये तुम्हास लागल्यास राजश्री बाळाराव यांणीं येथें गोपाळपंत कारकून याजवर चीठीं दोन हजार रुपयाची दिल्ही त्यास म॥रनिलेस चीठी दिल्ही त्यांणी आह्मासी उत्तर केलें कींदोन हजार रुपये देविले परंतु नेमून दिल्हा नाही तथापि तुची खर्चाची अडचण तरी से दोन (से) रुपये देतों तेव्हां आह्मी त्याजला खर्चाची वोढ फार सांगितली मग पांच से रुपयाची चीठी सावकारावर घेतली आहे परंतु येथील चालीच्या सिक्यास व भूपाळ व कुरराचे चालीस ऐवज त्याणें देवीला. त्यास दर सेकडा पांच सा रुपये बटा पडतो तयाजमुळें गोपाळपंत याजकडे दोन तीन वेळा गेलों यावरोन ऐवज दुसरा नाहीं ह्मणतात त्यास मी देईन. तुह्मी दुसरियाजवळ न मागावे. जे समईं तुह्मांस पाहिजेत ते समईं सांगावे याप्रों।। सांगितले आहे सारांष उभयताचें लक्ष आपले ठिकाणीं लागलें आहे मार्गीं येतांना हि वारंवार परामर्ष करीतच आले वोझेंपाझें व घोडीं पागेपैकी जे समईं मागितलीं ते समईं देऊन सांभाळून आणिलें. येथें हि कोठें देवधर्मास जाणें तरी घोडी रथ पाहिजे तरी सांगत जावें. पाठवून देऊं. याप्रों।। त्यांचे निरोप हि येत असतात. आह्मांस कोठें जाणें परंतु त्याजकडून अनमान कांहीं नाहीं. गवताचे व लांकडें जळाऊ याचें विचारिलें आहे. थोडीबहुत बेगमी करितों ह्मणोन बजाजीपंत यांणीं मान्य केलें आहे त्याजपैकीं दोन गाडे लांकडें जळाऊ आज पाठविलीं मागती येक वेळ त्याजकडे जाऊन काही बट्टा कमी जाला तरी उत्तम नाहीं तरी निदान पक्ष येवज बट्टादेऊन घेतों बाकी दीड हजार रुपयेविसीं बाळारावजीस त्यांणी लि॥ आहे. त्याचें उत्तर येईल तेव्हा देणार ऐसा भाव बोलण्यांत दिसतो. त्यास येक पत्र बाळारावजीचे गोपाळपंत याजला घेऊन जरूर पाठवावें कीं उजनींत ऐवज बट्टा न पडतां चालत असल्याप्रों।। ऐवज देणें दिक्कत न करणें याप्रों।। घेऊन पाठवावें ह्मणजे ऐवज त्यापासून घेतो. हाली चीठी दिल्ही आहे तो तर ऐवज घेतो. कलम १.