Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
रोजमरा छ. १६ सफरचा सर्वाबद्दल दिल्हा आहे. आघाव मात्र दिल्हे आहे. तेहि लिहिलें आहेत. कलम १.
बऱ्हाणपूरच्या मुकामींऊन एक पत्र व उजनीच्या मुकामी पावल्यावर दोन पत्रें अजूरदार याजब॥ पाठविलीं आहेत. पावली असतील. कलम १.
येजमानाकडे पाठविले बाकी ऐकूण तीस हजार च्यार से वसूल जाले नाहींत त्याची वरात पाटीलबावाची घेतली ती च दाखविली. आह्मी उत्तर केलें कीं आह्मांस बरातेसी समंध काय आहे येथें खर्चास लागेल ते तुह्मांपासून घेत जावें याप्रें॥ आज्ञा आहे त्याचा जाबसाल केला कीं येथे दुसरा ऐवज कोठून द्यावा सारांष आह्मी तगादा करावयास आळस करीत नाहीं. परंतु प्राप्त होणें कठीण आहे. एक पत्र हि आपण कुशाबास ल्याहावं कीं हर तजवीज करून च्यार पांच हजार रु॥ बाबूराव याजकडे देणें मग जे वसूल होतील ते घेऊं परंतु पत्र पाठवावें. कलम १.
येथें तीन घोड्या सरकारच्याव दोन तटे राहिलीं आहेत व येक घोडी आमची येकूण साहा त्याजला माणसें तीन मात्र मोतादार ठेविले आहेत. अधिक नाहीं व दोन गाडीचे बैलाविसीं कुशाबास सांगितलें आहे. हे देऊन दुसरे तरणे घेतो. बैल आणून देतों. ह्मणोन मान्य केलें आहे. बाळाजीपंताकडून दोन माणसें चौकी पाहरियास घ्यावयाची सोय नाहीं. त्याजला विचारिलें त्यांणी उत्तर केलें कीं तुच्या वाडियासमोर क॥दार राहतात त्याचीं माणसें तुमच्या दरवाजियासमोर आहेत त्यास आह्मीं सांगितलें आहे तुह्मी चौकी पाहरियाची काळजी न करावी. रुबरु हि क॥दार याची करून दिल्हीं आहे. क॥दार याच्या दरवाजियास व आपल्या दरवाजियास मधी गली मात्र आहे. अष्टौ प्रहर माणसें क॥दार याचीं आपले दरवाजियापुढें असतात. क॥दार यास हि आह्मीं सांगितलें आहे चिंता नाही. कलम १.
चिरंजीव राजश्री मुकुंद आपा याजवर हजार रुपयाची उंट गवत बाहेरून गाव खेडियाहून आणवावें लागेल यास्तव ठेविले आहेत. से॥ दापीबाई याजकडे येक खिसमतगार नवा ठेवून दिल्हा आहे. मातुश्री कामीकडे सटवा आहेच. त्र्यंबका कोठीचे कामावर व जामदारखाना याचे खोलींत आहे. खोली मजबूद आहे. संदूख मेळवितो. त्यांत लिहिल्याप्रों।। ठेवित जाऊं. पिराजी स॥दार व लक्ष्मण व समाधान व तुळाजी खास बारदार येकूण चौघे आहेत. रात्रीं चौघांनीं च्यार प्रहर जागत जावें. देवधर्मास जाणें तरी येथील घरचा बंदोबस्त राखून बरोबर जातात. चिंता नाहीं. जामदारखानियाचे खालीं जवळ नेहमी समाधान पूर्व्या अष्टौ प्रहर बसवीत असतो. त्याजला दुसरें काम नाहीं. कलम १.
चिठी बऱ्हाणपुरीं दिल्ही होती त्यास म॥निले आपले भेटीस आले याजमुळें आमची व त्याची भेट जाली नाहीं. हरिश्चंद्रपंत तेथे होते त्याजला ऐवजाविसीं विचारलें त्याच्यानें कार्य जाले नहीं. दोन माणसें तेथून ही आणली होती उजनीस पावल्यावर त्याजला निरोप दिल्हा. बसू जासूद व गोविंदा ह्मणोन प्यादा येकूण दोन असामी होत्या. कळावें. कलम १.
गवताची व लांकडाची बेगमी पुर्ती बाळाजीपंत याजकडून होतां दिसत नाहीं. जे होईल ती करून बाकी खरीदी करावी लागेल. कलम १.
येणेंप्रमाणें कलमवार लिहिलें आहे त्याजवरून विदित होईल. स्वारी इकडे येणार त्यापूर्वीच सूचना अगोधर आली ह्मणजे दाणादुणा खरीदी करणें तरी ठीक पडेल. नाही तरी माहागाई होईल ऐसें आहे. यास्तव अगोधर सूचना असावी. तिकडून कोण्ही नासिकास जाईल तरी बाबाजी गणेश याजला नासिकच्या बंदोबस्ताविसीं लेहून पाठवावें. तेथें दाणादुणा कांही आहे. हरभारा तो व बधारियाच्या बागांतील भात वगैरे होईल ते प्रोख्त करवावें. आतां ठेऊन उपयोग काय आहे. सेवेवीं श्रुत होय हे विज्ञापना. आपलेकडील वर्तमान वरचेवर लेहून पाठवीत जावें. हे विज्ञापना.