Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २४२.
१६९६ श्रावण शुद्ध १३.
पो। छ० २७ ज॥खर श्रावण
शेवेसी कृष्णाजी सिवदेव सां।। नमस्कार विज्ञापना. ता।। श्रावण शुद्ध १३ मुकाम अवंतिकापुरीं येथें स्वामीचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपली रबीची वरात रतलामेवरी खंडेराव त्रिंबक याजवरी होती. चैत्रअखेरचा वायदा होता. त्यास वैशाखमासीं ऐवजाची निकड म॥रनिलेस केली तेव्हां सरकारांतून च्यार दिवस ऐवज न देणें ह्मणोन कादारास ताकीद केली. त्याजउपरीं इंदुरास श्रीमंत आले तेव्हां आह्मी या समागमें गेलों. तेथे राजश्री आबाजी माहादेव याचे व पाटीलबावाचें रहश करून दिल्हें आमचे ऐवजाची निकड लाविली तेव्हां ताकीदपत्र कादरास दिलें. तो तेंच लस्करास आले मागती त्यांनी दोन महिन्याचा वायदा करून घेतला कीं रसदेचा ऐवज तूर्त सरकारांत द्यावा लागतो. यास्तव दोन महिन्यांनीं ऐवज पडे ऐसे सरकारांतून करार करून त्यांणी घेतला तो दोन महिने जाहाले रसदेचा हि ऐवज त्यास मिळेना. आणि लोकांचें हि त्यास देणें फार. माहालचा ऐवज वसूल घेतला तो मागील कर्जदारास दिल्हा. पुढें आणखी कर्जदारांनी त्यास फारच अडविलें. रसदेचा ऐवज मिळेना. तो आमचे ऐवजास ठिकाणच नाहीं. दुसरेयास मामलत सांगावीं ऐसें जाहाले. आह्मीं आपलें ऐवजाविसीं सरकारांत निकड लाविली तेव्हा त्यांणी सांगितले कीं तुह्मांस ऐवजाचे अगत्य असलें तरी सालमजकूरचा रसद देऊन जमा मामलत करणें ह्मणजे त्याची बाकी रांगड्याकडे असेल ती तुमचे हातास येईल. नाहींतरी येणार नाहीं. खंडेराव यास निकड लावावी तरी त्याची अवस्ता फारच कठीण. त्रिंबक मल्हार याजवरी चिठी देणें ह्मणोन निकड लाविली परंतु त्याचें चित्त शुध नाहीं. त्यांणी त्यास बाहेर घातलें. चीठी कांही कबूल करणार नाहीं. याचे स्वाधीन त्यांणीं शें दोनशें घोडे मात्र केले. ऐवज झाडून देशास घेऊन आले. त्यामुळें त्यास कर्ज भारी जाहालें. दुसरेयाणीं मामलत केली तरी बाकी आपले हातास येणार नाहीं. ऐसें जाणोन मामलत आपलेकडे करून घेतली. नर्मदेपर्यंत लष्करासमागमें गेलों होतो. कळावें. आषाढमासीं नर्मदेचे मुकामींहून मामलत आपलेकडे करून घेऊन येथें आलों. चवथ व नजराणा मिळोन पंचावन हजार रुो॥ तूर्त द्यावे लागले यांची तरतूद हा कालपर्यंत करितो. रु॥ उजनींत मिळत नाहींत. सावकाराचीं झाडून दिवाळी निघालीं फारकरून ऐवजाची तोड पडली. एका दो दिवसांत रतलामेस जाऊन आपले बाकीची रुजुवात करितों. रांगडे पंधरा वीस हजारांपर्यंत बाकी कबूल आहेत त्यास रुजुवातमुळें जाजती निघेल. त्याप्रें॥ वसूल करून लौकरी च पाठवितों. कार्तिक मार्गश्वर मासीं वसूल चालीस लागेल. पेशजी आठावीस हजार राजश्री विष्णुपंत बाबाकडे भरले. हाली आज्ञा कराल तेथें जमा करितों आह्मी येथील बाकीची रुजुवात करितों त्याची निशा पत्रीं घेऊन दुसरियाचे सुमारे भेटीस येतो. पुढें आणखी ऐवज सिंदे याजकडे येणें त्यास आपली त्याची समक्ष होईल तेव्हा त्याची तोड निघेल. याजकरितां लवकरच येतों. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.