Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री. 

लेखांक २३६.


१७०१ कार्तिक शुद्ध ८.

राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यांसि:-
रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ समानीन मया व अलफ. तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. र॥ व्यंकटराव पिलाजी यांजकडे पत्रें पाठवावयाचीं असल्यास अगोधर पाठवावी, ह्मणोन वगैरे मजकूर लि॥ ते कळले. त्यास हरजीवनराव व हणमंतराव या उभयतां कारकुनांस पत्रें लेहून पाठविली आहेत. जिदा बंदर येथील हकमांसहि खलिता पाठविला आहे. त्यास, ज्याहाज जाऊं लागलें ह्मणजे हीं पत्रें रवाना करणें. आजपर्यंत कारकून बंदर जिदा येथेंच होते. त्यास ज्याहाज सोईचें पाहून जर तें बंदर- मजकुरी असल्यास तेथें त्यांस पावतें करावें. नाहीं तरी, पुढें विलायतेस गेल्यास तेथें त्यांस जाऊन पोहचत अशा सोईच्या जहाजांवर रवाना करणें. जिदा बंदर येथील हकमांस खलिता आहे तो त्यांस पावता करावयाविसीं जहाजवाल्यास सांगोन रवाना करणें. तुमचे तीर्थरूपांस आरोग्य जाहलें असल्यास तुह्मीं हजूर येणें. जाणिजे. छ ७ जिलकाद. जनरल गाडर्ड येथून मुंबईस गेले आहेत, त्यास खलिता पाठविला आहे. हा पोहोंचतां करून उत्तर घेऊन पाठवणें. छ मजकूर. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)

पो।। छ १९ जिलकाद
सन समानीन.