Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २३९.
नकल.
१६९६ आषाढ वद्य ५.
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य रे॥ बाळाजी कृष्ण गोसावी यांसि:-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सु॥ खमस सबैन मया व अलफ. राजबाग राजश्री चिंतो विठ्ठल यांस ईनाम आहे. त्यास बागेच्या बेगमीस व बैल चरावयास मौजे कोथरुड येथील कुरण पेशजीपासून बागाकडे आहे. तें हालीं तुम्हीं जफ्त केलें आहे. ऐश्यास बागाचे बैल सालाबाद चरतात, तेथें चरूं देणें. व बागेचे बैलाचे बेगमीस तीस पसतीस हजार गवत निघतें तें काढीत असतात याप्रों।। कुरण आहे तें बागाकडे पेशजीप्रों करार केलें असे तरी राजाबागाकडे चालवणें. जाणिजे. छ १८ जमादिलावल. आज्ञा प्रमाण. सिक्का. मोर्तब.
बार.