Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
येथे कोट व हालीं सिका चालतो. येथून तट्टें पांच व उंटें दोन सामानसुद्धां पाठविलीं आहेत. पावतील. आपाजी सावाजी याची पालखी पो।। आहे. त्याच्या भोयांस आलेले हिसेब खर्चास आणखी हि जेथवर प्रेत्न होऊन गवत व लांकडें येतील तीं घेतच आहों. बाकी गवत व लांकडे विकत घेणें लागतील त्यास कुशाबांनीं येथे उज्जन प्रगणियापैकीं दोन गांव कमाविसदारापासून केले आहेत येथून पांच सात कोस तेथें गवताची व लांकडाची सोय पाहून खरीदी घेतों. गवताचा भाव त्या खेड्यांत रुपयाचे हजारा बारासे मिळतें. पेंढी नासिकच्या आपल्या कुरणच्या पेंढीप्रो।। आहे. येथें शहरांत गवत रुपयाचे पांच से अधिक मिळत नाहीं तेव्हां खेड्याहून आणवावें हें उत्तम दोन उंट येथें आहेत व दोन तट्टें आहेत घेऊन येत जातील. पेंढी लहान फार आहे. कडबा रुपयाचा तीन से च्यार से मिळतो. परंतु च्यार से कडबा मिळून आपल्याकडील ऐसी शंभर पेंढी होईल याप्रमाणें लहान पेंढी आहे कुशाबाच्या गांवापैकींच कांही रुपये २५ पंचवीस दिल्हे आहेत व तटें उंटे याजला खर्चास मार्गी हणवंताजवळ रु।।२५ पंचवीस दिल्हे आहेत त्याचा हिसेब तेथें समजून घ्यावा. लक्ष्मणराव पाग्या याजब॥ पाठविली आहेत. लक्ष्मणराव याची व हणवंताची रुबरू करून दिल्ही आहे. मार्गीं सांभाळून घेऊन जाईन. तेथें पोंचऊन पत्र पो। याप्रों।। करार केला आहे. जामदारखानियामागें राहावयास मिसल नेमून घेतली आहे. चौकी पाहरा करवून नेऊन पांचवितों ह्मणोन मान्य केलें आहे. कलम १.
येथून पागेचा सरंजाम वगैरे पाठविला आहे त्याची याद अलाहिदा असे. कलम १.
कुशाबाकडून कांही येवज हस्तगत करणें येविसींचा तगादा मारनिलेस लाविला आहे. त्याणें उत्तर केलें कीं अठावीस हजार रुपये वसूल जाले ते सोय पडली तरी तेथे घेऊं. सोईचा असल्यास नाहीं तर गवतच घेऊं. कलम १.
येथून मोत्तादार वगैरे पाठविले आहेत त्यास आदा येणेंप्रों।।
------------------- रोजमरा आघाव
हणवंता खो। ३ ५
येसू ३ ०
गुणाजी ३ ३
भवानी ३ ०
सारवान ३ ०
आणिक नवा ० २
ठेविला दरमहा
रु॥ ४ छ० मजकुरापासून
तेरीख पडले काम करावे तूर्त
-------- --------
१५ १०