Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक २३४.
१७०१ आश्विन वद्य ७.
राजमान्य राजश्री सदाशिव धोंडदेव यासि:- रघुनाथ बाजीराव नमस्कार सु॥ समानीन मया व अलफ. सरकारांत दारू करणार कारीगर यांचा दरकार आहे, त्यांस तुह्मी जनराल यांस हटकून दोन कारगिर त्याजवळ मागणें. शेवटीं त्याणीं येकच दिल्यास त्यास हजूर पाठविणें. जर जनरल यांणीं द्यावयास आनमान केल्यास तेथें कारीगर असतील त्यांचा शोध करून, त्यास फोडून तेथें त्याचा दरमहा असेल त्याहून जाजती च्यार पांच रुपये सरकारातून केले जातील हा लोभ दाखवून, आणि तेथें घरीं जातों म्हणोन निरोप घ्यावा अथवा सुरतेस जातों असा निरोप घेऊन हुजूर तुम्हीं त्यास पाठवून देणें. पेशजी तुम्हास पालखीच्या तावदानाविसी पांच च्यार वेळां लिहिलेंच आहे. त्याप्रों।। तावदानें पालखीच्या मेजाचीं हुजूर पाठवणें. जाणिजे. छ २० सवाल आज्ञाप्रमाण.
(लेखनावधि:)
पौ।।. छ १ जिलकाद, सन समानीन.