Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १२०.
१६९७ मार्गशीर्ष
व आपली फौज न फुटों देतां आहां तैसेंच मुंबईहून जाब येईतोंपर्यंत स्वस्त राहावें श्रीकृपेंकरून तुचे मनोदय खामखा सिद्धीस जातील. संशय न धरावा. बंगालवाले आमचें ह्मणणें ऐकतील. आम्ही केलें कर्म सिद्धी नेऊं. चिंता न करावी. हे गोष्ट गुप्त मनांत ठेवावी. गाईकवाड याचाही कारभार आहे तसाच असो द्यावा. मुंबईहून लिहिलें येईल तेव्हां सर्व समजेल. श्रीमंतांस कोणी कांहीं समजावील, हर एकाधी सला देईल, तरी कोणाचेंही ऐकों नये. याप्रमाणें ल्याहायासी सांगितलें. बारभाईंची फौज व फत्तेसिंगाचे लोक एकत्र होऊन विश्वासराऊ यसवंताची लडाई जाहाली. दोनीशें माणूस विश्वासरायानें कापून काढिलें. हें वर्तमान जासूद महाराजाकडे विश्वासरायाकडून पत्रें घेऊन येत होता त्याचे जबानीं ऐकोन उभयतां इंग्रजापासीं सांगितलें कीं, लडाई बंद जाहाली असतां बारभाईंनीं व गायकवाडानीं मिळून सरकारचा अंमल कसा उठविला व जुंजले कसे ? हें ऐकोन आश्चर्य मानिलें व महमद इसफावर बसराईची फौज याउपरीं जाणार नाहीं हें त्याणीं सांगितलें. त्यास, हे इंग्रज अगोदर अन्याय कोणाचा होतो हा लक्षांत धरितात. यास्तव अमीनखान अमदाबादेचें कामकाज होणार नाहीं व इंग्रजांचा शब्द लागेल ऐसी वर्तणूक होऊं नये येविसीं अमीनखानास सूचना लिहिणें सैती ल्याहावी. सबाह्य अभ्यंतर इंग्रजाचें लक्ष महाराजांकडे दिसतें. हे उभयतां कोषलदार गुप्त खलबत्ये आहेत. टेलर बंगाल्यास गेला. बाकी पांचजण मुंबईस राहिले. परंतु तिघेही फार शहाणे, समंजस व आपले मसलतीची चिंता करणार असे आहेत. या उभयतांनीं फार खातरजमा केली आहे कीं, त्यांस म्हटलें कीं, बंगालेवालें तुमचें न ऐकत, तेव्हां मग काय कराल, तुमच्या वचनावर आम्हीं फसावें कीं काय ? असें थोडेंसेंही बोललों. परंतु त्यांचें म्हणणें एकच, खामखा बंगालेवालें आमचें म्हणणें ऐकतील; फिकीर न करणें. याप्रों बोलणें जाहालें. मी जें त्यांसी कोंडून युक्तीचे वाटेनें काईल करून बोलिलों तें पत्रीं ल्याहावें तरी विस्तार होतो. यास्तव त्याचें बोलणें लिहिलें आहे. मुंबईस गेल्यावर सविस्तर सेवेसी लेहून पाठवितों. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
टेलराची रवानगी करून मग हे मुंबईहून निघाले. मुंबईकराचे हृद्गत या.
(पुढें मजकूर गहाळ.)