Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ८९.
श्री.
१६७६ वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामींचे सेवेसी-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत गेले पाहिजे. विशेष. दिल्लीकडील वर्तमान- चिरंजीव राजश्री रघुनाथराव व होळकर वगैरे सरदार फौजेसह दिल्लीत सुखरूप पोहोचले. वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षितबाबा यांची सवारी दिल्लीस आली आहे. त्यांचा बादशहाचे दरबारांत मानमरातब पूर्वापार आपले घराण्याचे योग्यतेनुरूप राहण्याची तजवीज रहावी, म्हणून निजाममुलुख असफजाहां यांस येथून लिहिले होते. चिरंजीव यांनीही दोन मुकाम अगोदर, दीक्षितांची स्वारी आली आहे, म्हणून बादशहास सूचन केली होती. त्यावरून योग्य तरतूद झाली व याबद्दल नबाब निजामुन्मूलूख असफजाहांचे पत्र मजकडेस आले. त्यांत ते लिहितात दीक्षितमहाराजांस दिल्ली शहरांत आणण्याकरितां लवाजम्यासह पेशवाईस जाऊन आणणेबद्दल बादशहाचा मला हुकूम जाला होता. त्याप्रमाणे आदरपूर्वक सन्मानाने शहरांत आणिले. बादशहाचे भेटीचे दिवशी वर लिहिल्याप्रमाणे मोठे सन्मानाने दरबारांत आणिले. खुद्द बादशाहा दरवाज्यापर्यंत सामोरे येऊन हात धरून नेऊन बसविले. फार सत्कार ठेविला. बादशहा दीक्षितांसी बोलले की, राजा शाहूचे जे गुरू व थोरले दीक्षित महाराजांचा पूर्ण आसिर्वाद औरंगजेब बादशहावर जाला असून आपलेच आशीर्वादे ह्या बादशाहीची दिवसेंदिवस उर्जित दशा आहे! आपले वडील पैगंबरप्रो होऊन गेले, तीच योग्यता आपली आहे. तेव्हां आपण येथे येऊन दर्शन दिल्यामुळे आम्ही आज कृतार्थ झालो वगैरे भक्तिपूर्वक भाषणे करून फारच गौरव केला. थोरले नारायण दीक्षित महाराजाप्रमाणे सन्मान ठेविला. नंतर पंधरा हजारांचा गांव जहागीर देऊन फरमान करून दिले व पोषाख, पालखी, मोरचेल, चवरी, जवाहीर वगैरे खिलत दिली. नवाबांनी लिहिले- दीक्षितांस जहागीरच काय! त्यांचे पुण्य बलवत्तर. त्यांजवर ईश्र्वराची कृपा व आपण त्यांचे शिष्य! तेव्हा त्यांस काय कमी आहेॽ परंतु –याशतींचे कल्याण व आम्ही कृतार्थ व्हावे याकरितां ही यत्किंचित् सेवा केली. याप्रमाणे पत्र आले. दीक्षित लवकरच काशीस जातील. शरीरे करून क्षेम आहेत. काळजी नसावी. वरचेवर पत्र येत असावे.