Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

लेखांक ८६.
श्री.
१६७५ माघ शु।। ८.
तीर्थस्वरूप राजश्री दादा वडिलांचे सेवेसी-

अपत्ये बाळकृष्ण दीक्षित पाटणकर विनंति. येथील क्षेम ता माघ शुध्द अष्टमी गुरुवार संध्याकाळपरियंत वडिलांचे आशीर्वादेकरून कुशल असे. विशेष. तुम्ही अहीराव।। पत्र पाठविले ते पावोन परम समाधान जाहाले. तेथे लिहिले की, रा विष्णुपंत प्रयागास आले आहेत, त्यांजला स्थल पाहिजे, त्यास, राजमंदिरांत स्थळ ठीक करून ठेवणे. म्हणून आज्ञा. त्यास श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांचे सासरे श्रीमहायात्रेस आले आहेत. त्यांनी आपणांस स्थलाविशी रा बाबूराव यांनी शास्त्री यांस व काशीरामास सांगोन स्थळ करार करून झाडून झुडून नीट करून ठेविले. ते तो गुंतले! पुढे रा विष्णुपंतास स्थल पाहतां काशींत मोठे वाडे तो नाहीत. त्याहीमध्ये गोविंदभट ठकार यांचा वाडा आहे. त्यास, गंगाधर पुराणिकही प्रयागासी आले आहेत. आपले विचारे जाहले तरी ते स्थळ नेमके अथवा येथे आलियावरी हर कोठे मिळेल. रा नाईक भिडे यांच्या स्थळासाठी तरी त्याचा उपाध्या काशीतील आहे. त्याचा वाडा मोठा आहे. त्यांनी झाडून ठेविला आहे. वरकड वर्तमान गंगाधरभट सांगता कळूं येईल. बहुत काय लिहिणेॽ हे नमस्कार.