Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ९०.
श्री.
१६७६ पौष शु.।९.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री. रामाजी महादेव नामजाद प्रांत साष्टी गोसावी यांसि-
सेवक बाळाजी बाजीराऊ प्रधान नमस्कार. सु।। खमसैन मया व अलफ. श्रीपरशुराम वास्तव्य चिपळोन येथील देवालयांवर चुना घालावा लागतो. त्यास पाइड बांधावयास लांकडे थोर व वांसे रायवळ ऐसे पाहिजेत. ते तुम्हांकडून देविले असेत. तर शे दोनशे वांसे व कांही थोर थोर लांकडे शेपन्नास याप्रमाणे तुम्ही तेथे पोहोचऊन देणे; व कांही शाकाराचे साहित्य गवत, पेढे ऐसे देणे. चुना घालावयाचे जरूर आहे. कारखाना रा।। जगंनाथ चिमणाजी यांजकडे सांगितला आहे. तर, दोनशे वांसे, शंभर लांकडे व कांही शाकार याप्रमाणे सत्वर चिपळोणास पोहोचऊन देणे देवणे. जाणिजे. छ ८ रबिलावल. बहुत काय लिहिणेॽ