Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अकरावा ( १६९१-१७६०)
लेखांक ८०.
श्री.
१६७३ माघ शु।। ६.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। छ४ रबिलावलपरियंत यथास्थित असे. आपण पत्र पाठविले ते पावले. लिहिले वर्तमान स।। कळले. ऐवजाविशी आपणांस लिहिले होते. त्यावरून आपण लिहिले की, ऐवज लाख पावेतो तजवीज केली आहे, परंतु व्याज सवोत्रा बिनसुट पडेल, म्हणोन. त्यास सवोत्रा बिनसुट व्याज म्हणजे बहुत भारी! परंतु ऐवजाची निकड, यास्तव कबूल करणे लागले! लिहिल्याप्रमाणे व्याज करार करून, दोन खते लाख रुपयांची, दर पन्नास हजारांचे एक, याप्रे।। दोन डौल लिहून आपणाकडे पाठविली आहेत. यांत नांवे भरून आपण द्यावी आणि ऐवज घेऊन लष्करामध्ये येऊन पोहोचे, अशी तजवीज ऐवज करून पावे ते (करावे). ऐवज बहुत माफजातीने सुरक्षित येऊन पोहोच त्या विचारे पाठवून द्यावा. तुम्हाजवळ ऐवज जमा होईल त्या मित्या लिहून पाठवाव्या. त्याप्रमाणे येथे जमा केला जाईल. खतामध्ये मित्या तुम्ही घालून देणे. सु।। इसन्ने खमसैन मया व अलफ. हे विनंति.