Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ७८
श्री.
१६९४ भाद्रपद वद्य २
सेवेसी आबाजी बाजी कांबरस व रामचंद्र महादेव परांजपे. विज्ञप्ती. श्रीमंत महाराज राजश्री शिवाजी महाराज स्वामी यांसी तालुके चिबोडी व मनोळी दिल्हे आणि त्यांजकडोन ऐवज घ्यावयाचा करार केला रु। १२५०००१ बारालक्ष पन्नास हजार एक. सदरहु रुपये यांचा हवाला आह्मीं घेऊन ऐवज भरिला आणि दोन्ही तालुके ठाणींसुद्धां राजश्री आपाजी शामराव यांचे निसबतीस सावकारींत श्रीमंत महाराज स्वामी यांणीं ठेवून करार करून दिल्हे आहेत. त्याप्रों मुद्दल व व्याज, मनोती व दरबार सर्व सुद्धां ऐवज फिटे तों दोन्ही तालुके आह्मांकडे असावे. मधें महाराजांनीं आपाजी शामराव यांसीं व आह्मासीं हरएक गोष्टीविषयीं दिक्कत आणून तालुकेयाची घालमेल करितील किंवा सरकारांत आणखी मध्यस्ताचे हातून हरएकविशीं लोभ दाखवून संधान करितील आणि तालुक्याची घालमेल करवितील; किंवा भगवंत आपाजी व राजश्री शेषो नारायण यांचे कर्जाचा फडशा महाराजांकडून होणें आहे, तो सुरळीत न केल्यास सरकारांतून मानिल्हे तालुक्यांत उपद्रव करवितील; तर आमचा पैका कराराप्रों अगोदर देवावा. मग कर्तव्य तें करावें, अथवा आमचा पैका फिटे तों पुस्त पुन्हां करून घालमेल होऊं देऊं नये. भगवंत आपाजी व शेषो नारायण यांचा कांहीं पैका निघाला; आणि सरकारांतून देवणें; तरी परभारें महाराजांकडून देवावा. आमच्या दोन्ही तालुक्यांस उपद्रव लागों नये, येणेंप्रमाणें करार करून अभयवचन दिल्यास सेवक या कामांत येतील. कलम. सदरहुप्रमाणें तुम्हीं विनंती केली. त्यास तुह्मी बेवसवास या कामांत येऊन ऐवजाचा भरणा करणें. तुह्मास श्रीमंत महाराज छत्रपती स्वामी यांनी दोनी तालुक्यांचा ऐवज अपाजी शामराव यांचे विद्यमानें लाऊन दिल्हा आहे. त्याजप्रमाणें घेत जाणें. सरकारांतून दोन्ही तालुकियांस उपद्रव होणार नाहीं. कदाचित महाराज स्वामीकडून तालुकियास उपद्रव जाला, तर सरकारांतून पुस्तपुन्हा राखून तुमचा पैका व्याजसुद्धां फिटे तोंपर्यंत तालुकियाची घालमेल होऊ देणार नाहीं. येणेप्रमाणे करार छ १६ जमादिलाखर, भाद्रपद मास, सन सल्लास सबैन.