Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५९५
श्री.
१७२४ भाद्रपद शुद्ध १
स्वामीचे सेवेसी. विनंति सेवक मल्हार रामचंद्र कुळकर्णी सां नमस्कार विनंति विज्ञापना ता। भाद्रपद शुद्ध परियंत आपले कृपेंकरून यथास्थित असें, +++ अलिकडे वर्तमानः-डालटन साहेब याचा मुख्य सरदार दीपन साहेब ब-हाणपुराकडून आला. भाद्रपद शुद्ध १ आपले गांवीं आला. त्यानें हि बहुत गर्दी केली. शिवरामपंत तात्याची हवेली उघडून राहावयास येऊं लागला. मग मोठे प्रयासें अंबादासपंत सेंदुरणीकर यांणीं बाहेर अभ्यंकराचे वाड्यांत उतरविला. मोठी मारामार केली. ब्राह्मणांची आब ठेविली नाहीं. सदाशिव दिक्षितांचे आंगणांत घोडे बांधून माहाराची राहोटी दिली. मग, मोठ्या प्रयासें दुसरे दिवशीं तो माहार काहाडला. त्यानेंहि दोन हजार कडबा घेतला. कडबा कोठें मिळेना. उशीर लागला ह्मणोन, परसरामभटाचा हात बांधला, व मकवा होडले ! दाहापंधरा चाबूक मारले. अंगुठा पिरगाळला. तो अद्यापि नीट जाला नाहीं. मग काल मंगळवारी दीपनसाहेब सडा उतरोन पुन्यास आला आहे. अंबादासपंतहि त्यासमागमेंच आहे.
आपले गांवीं कंपू उतरला, यानें अगेदर चंदी वगैरे घेतलें. तो मार सविस्तर पत्रीं लिहिलाच आहे. त्यावर, त्यानें आणखी चिठी मनश्वी सरंजामाची केली. आजमास चिठीचा पाहतां, दोनशें रुपये होऊं लागले. मग बहुत प्रयत्न केला. अंबादासपंतांनी बहुता प्रकारें प्रयत्न केला. परंतु तो ऐकेना. अंबादासपंतासीं त्यानें करार केला कीं चिठी माफ करतों, अंबादास पुंन्याकडे आला. दुसरे दिवशीं नेहमीं शिपाई पाठवून साहिंकाळपरियंत मला बसविलें. साहिंकाळीं दाहापांच ब्राह्मण तेथें पाठविले. तो मनश्वी बोलूं लागला. सेवटीं चिटीपो कांहीं जिन्नस घेतली. बाकीहि उदईक द्या ह्मणतो, याप्रमाणे मोठी धूम केली. पुढें कुचहि करित नाहीं. राण फार तुडविलें, तरी बाजरी तमाम बैलांस तोफेच्या चारलें. याप्रमाणें आजपरियंत गर्दी केली. पुढें काय करील, हें नकळे, +++ हे विनंति.