Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५६५

श्री ( नकल )
१७२४ वैशाख वद्य ७

राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा गोसावी यांसीः-

सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो। बाजीराव रघुनाथ प्रधान आशीर्वाद विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. आपणाकडे संस्थान गढेमंडळे रेवाउत्तरतीर याजबाबत ऐवज पेशजीं सरकारांत घ्यावयाचा करार केला आहे. त्यापैकी, बद्दल देणें, नारायण बाबूराव वैद्य यांचे गुजारतीनें कंठी मोत्यांची एक सालमजकुरीं सरकारांत खरेदी केली. त्याची किंमत रुपये ११९००० एक लक्ष एकोणिस हजार रुा देविले असेत. तर पावते करून पावलियाचें कबज घ्यावे. रा छ २१ मोहरम, सुा। इसन्ने मयातैन व अल्लफ, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति. सिका बार.