Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५६१

श्री.
१७२४ वैशाख वद्य १

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-

विद्यार्थि गणेश शिवराम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता वैशाख वा १ आपलें कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. यानंतर पत्रीं आज्ञा कीं, रा। येशवंतराव होळकर यांची बातमी थाळनेरास दाखल जाल्याची ऐकिली होती. पुनां माघारें गेल्याचें ऐकतों, येविशीं सत्यमिथ्या खचित वर्तमान आणवावयाकरितां मालेगांवीं माणूस पाठवित असों. त्यास, तुमचें पत्र पाठऊन देणें म्हणून आज्ञा. त्यास, मालेगांवीं माझे कनिष्ट बंधू चिरंजीव शामरावजी आहेत. त्यांस पत्र लिहून पा आहे. हें मनन होऊन रवानगीची आज्ञा व्हावी. म्हणजे तेथून सविस्तर बातमी येईल. लखोट्यावर शामराव शिवराम म्हणून लिा द्यावें. आणि माणसास सांगावें, गणपतराव मोकाशी यांचे घर पुसावें ह्मणजे गुंता पडणार नाहीं. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.