Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५७
श्री.
१७२४ चैत्र वद्य १०
पो मिती चैत्र वद्य १२ गुरुवार, सहस्त्रायु चिरंजीव लक्ष्मीनारायण दीक्षित यांप्रति गोविंद दीक्षित आशीर्वाद उपरी येथील क्षेम चैत्र वद्य १० तिसरा प्रहर जाणोन स्वकीय लिहिणें, विशेष, तुह्मीं दोन पत्रें पाठविलीं. तें एक दोंप्रहरीं व एक तिसरे प्रहरीं पावोन वर्तमान कळों आलें. लष्करचे गडबडीमुळे लोक भयाभीत जालें, म्हणोन विस्तारे करून लिहिलें, त्यांस राजश्री आबाजी महादेव व चिंतो विठ्ठल या उभयतांस मल्हारपंताहातीं आमचें नांवें पत्रें लिहणें. त्यांत मजकूर कीं, आपले सैन्याचा रोंख तिरस्थळीवर यावयाचा आहे, म्हणोन येथील ब्राह्मण सर्व भयभीत जाले आहेत, त्यास आपलें अभयपत्र आलियास लोक निश्चित राहतील, याप्रों पत्रें देऊन माणसें लष्करास पाठवावीं. तेथील उत्तर आश्वासनाचें आलें तरी उत्तमच जालें, नाहींतर, तुम्हीं इकडे यावयाचे करावें, वो बाळकृष्णभट हालीं टोकियांत आहे. त्यांजला वे। नारायण जोशी यांजला भेटावयासीं सांगितलें आहे. तिकडेहि पाठऊन बंदोबस्त जेथवर होईल तेथवर करून घ्यावा. लष्कर नगराहून कूच जाहलियास तिरस्थळीचे दाहावीस ब्राह्मण पुढें पाठविणें. बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद,