मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५५२

श्री.
१७२३

यादी हैबतराव आटोळे धुरंधर समशेरबहादर विज्ञापना ऐसीजेः-

सरकारची सेवा बहुत दिवस सर लष्कर याजबरोबर करीत आलों. सुरसन इसने मयातैनचे सालीं सरकारांतून सरंजामाची जप्ती केली. याजकरिता विनंती करावयासी कारकून हुजूर पाठविले आहेत. सरंजामाचीं गांवें व खेडीं बहद्यामुळें बिलकुल उज्याड जालीं. सबब, सरदारी फार वोढींत आली. त्यास, स्वामींनी कृपाळू होऊन, शेवाचाकरी घेऊन, सरंजामाचे मोकळिकीविशी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries