Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५४
श्री.
१७२४ चैत्र शुद्ध १३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गंगाधरपंत तात्या स्वामीचे सेवेसी:-
पो रामचंद्र रावजी सां नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम तार चैत्र शुा १३ जाणून स्वकीय लिा. विशेष. नथू हलकारा लष्करांतून आला. बेलापुरावर दोनचार मुकाम आहेत. पुंतांबें उज्याड आहे. परंतु चवकी होळकरानें पाठविली कीं, भलताच न लुटी. मग तेच काय करतील तें करोत. बेलापूर उज्याड, परंतु त्यांजला भक्षावयास मिळतें. घरें खाणावीं. दाणा, कडवा लागतो तो नेतात. मनस्वी धामधूम करितात. ते पत्रीं लिहितां पुर्वत नाहीं. घर उकलून जाळितात. बेलापुराहून पुंतांबियासहि दोनचार मुकाम होणार, म्हणून बोलतात. ऐसें नथू मारानं जबानीं सांगितले. खासास्वारी होळकराची बेलापुरास आली. परंतु तोफखाना राहुरीवरच आहे. मुकाम फार ऐकून येथील गरीबगुरीब भयाभीत जाले. बायकामुलें बाहेर आजच लाविलीं. परंतु फार भितात. उद्यां परवां गांव बेचिराख होईल, असें दिसतें. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञप्ति. इत्यादि.