Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५५५
श्री.
१७२४ चैत्र शुद्ध १३
पौ चैत्र वद्य १ सोमवार.
वो राजश्री ब्रह्मभट यांसीः-
प्रति लक्ष्मीनारायण दीक्षित नमस्कार विनंति येथील क्षेम ता चैत्र शु। १३ पावेतों मुा पुणें येथे सुखरूप असों, विशेष. मी आल्या ता तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही. तर वरचेवर लिहून सविस्तर कळवीत असावें. यानंतर कायगांवचें वर्तमान लुटल्याचें आइकिलें होतें. परंतु येथे आल्यावर पक्की बातमी समजली कीं, सर्व क्षेम आहेत. कांहींएक उपद्रव देखील जाला नाही. तुम्ही स्वस्थ असावें +++ हे विनंति.