Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १६०.

श्री.
१६९७ चैत्र वद्य ६

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आबा स्वामींचे सेवेसी:-

पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेष. तुह्मीं छ २७ मोहोरमची पत्रें पाठविलीं तीं प्रविष्ट जाहालीं:--

आरमाराकडे गल्ली नेमिला त्या पौ कांहीं पोंचत नाहीं, मामलेदार तपशील सांगतात, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, तुमचे लिहिल्या पूर्वींचे सरकारचे खिजमतगार व पत्रें भाताचे वसुलास पाठविले असेत. या उपरी नेमणुकेप्रों गल्ला पोहोंचेल. कलम १
देवगड तालुकियापौ सरदार चौतीस आहेत, त्यापौ निमे तालुके मजकुरीं ठेवावे, निमे दुसरे तालुकि यांस नेमावे, ह्मणोन लिहिलें तें कळलें.

उत्तम आहे. करावें कलम १ गंगाधर, गोविंद यांणीं गलबत नारळाचें धरून आणिलें म्हणून लिहिलें तें कळलें. कलम १.
इंग्रजांचे कागद पेटींत घालून पाठविले ते पोहचले व चित्रें पावलीं कलम १.
---
गोंवेकर फिरंगीयांचे गलबत आणिलें आहे, येविशीं त्याचें पत्र आलें आहे, त्यास तहाचा ठराव कसा जाला आहे, म्हणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास, तहनाम्याची नकलच अगोदर तुह्मांकडे पाठविली आहे त्यावरून कळेल. तेथें लिहिलें असेल त्याप्रों पाहून लेहून पाठवावें. कलम १.

सर्व तालुकदारांस व आरमारांस तहनाम्याप्रों सांगून .... जिवाजी विश्राम भेटीस येणार म्हणोन लिहिलें तें कळलें. उत्तम आहे. सरळपणें येत असल्यास भेट द्यावी. कलम १.

बाबूराव साळेकर याचा मजकूर तुम्हीं लिहिला तो कळला. ऐशियास मारनिले यांणीं किल्ले विजयदुर्ग येथें गंगाधर गोविंद यांजवळ चाकरी एकटेयांनी करून वेतन नेमणुके प्रों रत्नागिरीं लाऊन घ्यावें. अरमाराकडे त्याची नेमणुक नाहीं. कलम १.

एकूण कलमें सात लिहिल्याप्रों करावें. राजश्री हरबाजीराव धुळप आरमारसुधां स्वारीस गेले होते, डंगी धरून आरमारसुधां आले, ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशियास, डंगीवरील माल फरोख्त करऊन आरमाराकडील तोडमोडीस लाऊन, व अडसेरीचे बेगमीस गल्ला घेऊन अडसेरीस देऊन, आरमार सुवर्णदुर्गास पाठवावें. रा छ २० सफर बहुत काय लिहिणें, लोभ असों दीजे. हे विनंती. पो छ २८ सफर.