Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५६.
श्री.
१६९६ माघ–फाल्गुन
सेवेसी नारो आपाजी सां नमस्कार विज्ञापना. विसाजी कृष्ण यांस तूर्त महिनाभर आणूं नये. खालें आहेत त्याप्रों असों द्यावे. परंतु, त्यास निक्षून पत्र असावें कीं, तुह्मी परशीकाजवळ जाऊन सारे फौजेनिशी राहाणें, केलण्या (कल्याण ) कडून परशिकापावेतों पातळ उतळ राऊत तलाव्यास पाठवीत जाणें, कल्याणास एकंदर न राहणें, या प्रों परिच्छिन्न ल्याहावें. हे त्यांच्यानें होत नसल्यास मग दुसरे पत्रीं काय आज्ञा करणें ते करावी. कर्नाटकांत पाठविणें जरूर असिल्यास तसेंहि करावें. विसाजी केशव व सर,... आपाजी हरी व शिवाजी विठल यांस निक्षुण पत्रें पाठवावीं. चौदाशें माणुस आवघें साष्टीच्या बेटांत येशवंतगडसुधां इंग्रजांचें आहे. तुह्मांजवळहि भरणा बराच आहे. याउपरी हर तरतूद करून इंग्रेजांस पेंच पडे, बेटांत लोक उतरून ठरेत, अशी तरतूद होत नाहीं, हें ठीक नव्हे. हेटधारे लोकांस इंग्रज काय करितो ? आंतील आंत खायास व पाणी पायच्या माणसांस उपड आहे असें असोन कडव्या माणसांवांचून होतच नाहीं ह्मणऊन लिहितां ! तरी गनिमी त-हेनेंहि आंत राहीन ह्मटल्यास त्यास सहजच पडेल ते तरतूद करून लेहून पाठवणें. ह्मणऊन पत्रें लेहून पाठवावीं.