Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १५१

श्री
( नकल ) १६९६ माद्रपद वद्य ९

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारोपंत नाना स्वामीच सेवेशीं-

पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ २२ माहे रजब पावेतों यथास्थित आहे. विशेष पत्र पाठविलें तें पावलें. किल्ले पुरंधर येथील बंदोबस्ताचा मजकूर लिहिला तो सविस्तर कळला. रा दिपाजीराव येरूणकर यांचें पत्र पाठविलें तें येऊन पावलें. * तुह्मीं तेथें जाऊन. बंदोबस्त केलांत, उत्तम गोष्ट झाली. गुंता उरकला. तुमचे तर्फेनें यंदा हरएक कामाबद्दल कोण प्रस्तुत आहे ? महिपतराव तों अद्याप आले नाहींत. लष्करांत गेलियावर सदैव पत्र पाठवित जावें. बहुत काय लिहिणें ! लोभ असों द्यावा. हे विनंती.