Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५५
श्री
१६९६ माघ शुद्ध ९
सेवेसीं नारो आनंदराव सां नमस्कार विज्ञापना ता छ ८ जिल्हेज मुा नजीक बडोदें यथास्थित असे. विशेष. स्वामीचें आज्ञापत्र छ १४ जिल्कादचें आलें. त्या पत्रीं आज्ञा कीं "तीर्थस्वरूप तिकडे आले. त्यांचे पाठीवर राजश्री हरी बल्लाळ व शिंदे होळकर मातबर फौजेनशीं आले आहेत. त्यांस तुह्मी हरीपंतास लेहून पाठऊन तिकडून फौज आणून भडोच व सुरतेची बंदी करणें, टोपीकरास ताण जरूर देणें. सरकारचा अमल च्यार दिवस न चालल्यास कामास येईल. पुढें सर्व समजोन घेतलें जाईल " ह्मणोन आज्ञा जाहाली. त्यास, श्रीमंत राजश्री दादासाहेब बडोद्यास आले. त्यांचे पाठीवर हरपंत येतांच श्रीमंत महीपार गेले. आह्मी रेवा उतरोन फत्तेसिंगराव गायकवाडसुद्धां हरीपंतांस भेटलों. श्रीमंतांचा तहाचा मजकूर करारांत आलियावर सुरतेस जाऊन आज्ञेप्रों बंदोबस्त, करितों. तूर्त सुरतेचे बंदोबस्तास राजश्री बाळाजी खंडेराव पुरंदरे व बळवंतराव धोंडदेव व शंकराजी लक्ष्मण पुरंदरे पाठविले आहेत. राजश्री बहिरो रघुनाथ व गणेश हरी निा सरसुभा तापीतीरीं सुरतेनजीक आहेत. त्यास बंदीविशीं पत्रें पाठविलीं आहेत. त्यांच्यानें बंदोबस्त होईल तितका करितील, श्रीमंत दादासाहेबाकडिल जाबसालाचा फडशा होय तोंपर्यंत तिकडे जातां येत नाहीं व राजश्री हरीपंतहि निरोप देत नाहींत. लवकरच फडशांत येईल, सलुखावर घातलें असे. मागाहून सविस्तर वर्तमान सेवेसी लेहून पाठऊं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.