Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५४
श्री
१६९६ माघ, सेवेसीं नारो आपाजी सां नमस्कार विज्ञापना.
मुधोजी भो यांजकडील देवाजीपंतांचे पत्र आलें त्याचा मजकूर समजला. नबाबाचा पोख्त मनसबा खराच ! परंतु प्राप्त काळास ठीक नव्हेसा वाटतो. नवाब गुंतले तरी आपणच गुंतले असें आहे. चहूंकडे चार मनसबे वाढले. हा आणखी एक होतो. तेव्हां खर्चाचा ताण चहूंकडील व फौजेच्या खर्चाचा पेंच; व साष्टीची मसलत, व कर्नाटकांत फौज आणखी गेली पाहिजे; व परंदरीं फौज पाहिजे; पुणियांत पांचशें राऊत पाहिजेत. चहूंकडून खर्चाची मोडणी! वरातांची वगैरे पाहतां फारच आहे. त्याहून आणखी वाढते. याजकरितां मर्जीस आलें तरी देवाजीपंताच्या पत्राच्या नकला करून नबाबाकडेच पाठवाव्या आणि त्यांसच ल्याहावें. आपण पोक्त मनसबा ह्मणतात याप्रों करावयाचा ठीकच आहे. परंतु थोरला मनसबा श्रीमंताकडे. सारी फौज तिकडे गुंतली व आपण हिकडे गुंतले, तेव्हां हैदर नाईकानें फार लबाडी केली. त्याचें पारिपत्य जालें पाहिजे व स्वदेशीं फौज असली पाहिजे. आपणाकडेही फौज आलीच पाहिजे. तूर्त मर्जीस येईल तरी आपण त्यांस आणऊन, मुधोजी भोंसले यांनीं चांद्यासच राहावें, रघोजी भोंसले यांजवळ राहूं नये, रघोजी भोंसले व दर्याबाई यांनीं नागपुरीं राहून तहाप्रों वर्तावें, असें त्यांचे माथां भार ठेऊन केल्यानें प्राप्त काळास ठीक पडलेंसें वाटतें. पुढे कांहीं बदमामली दिसल्यास, फिरोन गोष्ट सांगावयास काय आहे ? करितां येईल. परंतु यासमयीं मसलत न वाढे तो प्रकार राजश्री कृष्णराव यांस लेहून दिला तरी बरासा वाटतो. नबाब तिकडे गेले, त्यापक्षीं त्यांस हेच गोष्टी बोलणें त्याच्या स्वरूपास योग्य. परंतु पुढें मागें पाहतां चहुंकडून शत्रु उठले, नबाब न गुंतेत तरी बरें, मला सुचला मजकूर लिहिला आहे. स्वामी विचार करून करणें तें करतीलच. सेवक लोकीं असलेली गोष्ट विनंति करावी. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना. सलूख करणें तो नवाबाचेच हातें व्हावा. ह्मणजे गुंता पडणार नाहीं. हे विज्ञापना. राजश्री कृष्णराऊ तेथून निघाले आहेत. जवळ आले असिले तरी भेटून त्यांची रवानगी व्हावी. ह्मणजे नवाबास वाईंट न वाटतां कारस्थानानें मनसबा न वाढे आणि भोंसला आपले पदरीं पडे, असें जाल्यास बरेंच आहे. कांहीं नजरहि होईल. पैका नसल्यास नजरेचे ऐवजीं मुलूख देईल. तूर्त बखेडा मोडेल. स्वामीस उचित वाटेल तें करण्यांत येईल. सुचला अर्थ लिा आहे. हे विज्ञापना.