Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
महिकावती (माहिम)ची बखर
प्रसंन जाला जाणोस शंकर ।। मग आला तो सुरेश्वर ।। तो च दिवस पवित्र ।। रुतु दीधला स्त्रियेसीं ॥ ४१ ।। ते राहिली गरोदरा ।। कंन्यारत्न आलें उदरा ।। पुढिल कथा दातारा ।। आईक आंता ।। ४२ ।। मग नवमास भरले ऐसिया परी ।। तंव ते जन्मलि कुमरी ॥ जाणो विद्युल्लता दुसरी ।। लावण्यस्वरुपें ।। ४३ ।। ऐसि ते सकुमारी ।। उपवर जालि इंद्रकुमरी ॥ मग गुरु पाचारोन विचारी ॥ वर तियेसी ।। ४४ ।। तवं बोलिला बृहस्पती ॥ स्वयंवर मांडावें सुरपती ।। ते ज्याचे असेल लिखितीं तो वरिल तियेतें ॥ ४५ ॥ मग इंद्रे मांडिलें स्वयंवर ॥ सुरवर नर मिळाले अपार ।। तेथे जाई तुं सत्वर ।। ब्रह्मदेव सांगितलें ।। ४६ ॥ जे तुजसी वरिल ।। ऐसें आहे अक्षर ।। ह्मणोन जाई वेगवगत्र ।। सूर्य सुता ॥ ४७ ॥ तो जाणोनियां समारंभ ।। स्वयंवरि मिळाले सुल्लभ ॥ तेथे आला प्रभु ।। अर्क नंदन तो ।। ४८ ॥ तवं श्रृंगारिली ते नोवरी ॥ रत्नखचित बासिंगे शिरी ।। खोपा भरिला नानापरी । पारिजातककुसुमीं ।। ४९ ॥ कर्णि कनकपत्रें नागोदरें ॥ पालव फुलें पन्नगकशरें ।। शेषकुळें मनोहरें ॥ पवित्र तीं ॥ ५० ।। बरवा भांग मिरवे सिंदुरी ।। कंचुकि कसिली मुक्ताफळी ।। तेज फांकताहे अंबरी ॥ लावण्यतेचें ।। ५१ ॥ कपाळिं अर्धचंद्र टिळक ॥ तांबोल मिरवताहे मुखा ।। कंठि माळा सुरेखा ।। दिव्य रलाचिया ।। ५२ ।। बरवा नेसलिसे पीतांबर ।। चरणि नेपुराचा गजर ।। करि मुद्रिका तेज थोर ।। फांकताहे ।। ५३ ।। ऐसि ती लावण्याचि खाणी ।। त्या तपाचि घडणी ।। मग आणिली श्रृंगारोनी ।। सभे माजी ।। ५४ ।। मग ते बैसविली हस्तिणी ।। जाणो दुजा दिन उगवला गगनी ॥ ते देखता जाला नयनीं ।। चंद्रराजा ।। ५५ ।। तवं तो धाविन्नला झडकरी । आणि हरिली ते नोवरी ॥ हाहाकार जाला सुरवरीं ।। धाविंन्नले समस्त ।। ५६ ॥ येरें धनुष्य संजोगिलें ।। सहश्र बाण गुणि लाविले ।। संग्राम करों आदरिलें ।। चंद्र सेने ।। ५७ ॥ सुरवर शस्त्रें वर्षती ।। जैसा प्रजन्य पडे क्षिती ।। यरु निवारि शस्त्रशक्ती ।। चंद्रशेन ।। ५८ ।। तवं धाविंनला वज्रपाणी ॥ चंद्रसेन वज्रें हाणितला निर्वाणी ॥ तवं येरे पीटिलें बाणी ॥ शस्त्राशस्त्र ॥ ५९ ॥ तरि अपो हे संग्रामिची कथा ॥ तेणे जिंतिलें सुरवरां समस्तां ॥ जो येक द वि सत्ता ॥ सर्वा ठायीं ।। ६० ।। जो त्रैलोक्य जाळों सके अर्क ।। त्याचा. तो बाळक ।। तया जिंकु न सक त्रिंबकु ।। महा-विरातें ॥ ६१ ॥ मग तयें महाविरी ।। बळें आणिली इंद्रकुमरी ॥ हरुष जाला अंतरी ।। चंद्रशेनासीं ॥६२॥ असो भरला येक संवत्सर ।। तवं सुमध जाला पुत्र ॥ तवं बृहस्पतिने जाणविला विचारु ॥ सोहिरीकिचा ।।६३।। इंद्र आणि सविता ।। हे बंधु गा अर्कसुता ।। परी न टळे पुर्वलीखिता ।। ह्मणोन ऐसें जालें ॥ ६४ ॥ मग तें करावया पुर्णापूर्ण ॥ पंढरि आला आपण ॥ तवं-तया क्षेत्रा अष्टवदन ॥ खेळिजे देखा ॥ ६५ ॥ मग तें धरोनि रूप तापस ॥ हृदइं ध्यातसे रुषिकेश ।। ऐसे भरले बहु दिवस ।। तपबळें ।। ६६ ।। मग तेथे करोनियां विवर ॥ गोरांगणिने जाळिले शरिर ।। तयासि ब्रह्म अगोचर ॥ लाधलें देखा ।।६७॥ मग तें कुंडाचे स्थान ।। तेथे जळ जालें पूर्ण ॥ तवं धाविनला शेषशयन ।। श्रीहरि तो ॥ ६८ ॥ तो उचलांनि भक्त ।। निजस्थानि नेत अनंत ।। तया दिधली अपरोक्ष मुक्ती ।। अगोचर जे ॥६९।। मग तया चंद्रविराचा स्थानी ।। पुंडलिक भक्त, असे निर्वाणी ।। गंगचे गा निजस्थानी ।। जालि चंद्रभागा ।। ७० ॥ ते चंद्रशनाचें क्षेत्र ।। ह्मणोन चंद्रभागा सरोवर ।। तें कथिताहे वशिष्ट रुषेश्वर ॥ सूर्यवंशातें ।। ७१ ॥ जें बोलिला वशिष्ट मुनी ॥ तें आइकावें श्रोतेजनी ॥ जें सूर्यवंशा लागेानी ॥ सांगितलें तेणे ।। ७२ ॥ तो रुषि राजगुरु ।। परोपकारी बोलिला रुषेश्वरु ।। जाणोनि क्षेत्रवंश पवित्र ।। केलें कथन ।। ७३ ॥ तो वशिष्ट महामुनी ॥ आणि संस्कृत बोलिला वचनी ।। तें ऐकावें प्राकृत वाणी ।। वंशविस्तार हा ।।७४॥ मग तया चंद्रशेनाचा पुत्र ।। राज्य करि महाविर । । तया जाले तिघे पुत्र ।। महाबळिये ते ।। ७५ ॥ शंभु रघु ताम्र ध्वज ॥ हे तिघे सहोदर ।। त्यां पासोन परंपरा ।। वाढलि क्षिती ।। ७६ ।। त्रिवेधु १ सुसंवेधु २ त्रिशंकवेधु ३ ऐसे क्षेत्रि महाविर ।। राज्य करिती नृपवर ॥ तवं जन्मला सावा अवतार ।। परशराम ॥ ७७ ॥ तेण्हे वधिले समस्त क्षेत्री ।। एक भाग राहिला रुषेश्वरी ।। परशरामाचे निकरी ॥ व शिष्टे तेणे ।। ७८ ऐसे वीस वेळे राखिले ।। येकवीस वेळां पाळावे ।। तवं विश्वामित्रें सांगितलें ॥ रेणुकानंदनासी ॥ ७९ ॥ तेणें निर्वाण केलें ।। सर्व क्षेत्रि मारिले ।। राखिले होते ते हि वधिले ।। परशरामे ।। ८० ॥ जाला जाणेनि नीर्वेश ।। दुःखे विरोधला दिवस ॥ तेण्हे अंधकारें होउं पाहे नास ।। चराचराचा ॥ ८१ ॥ सूर्य विरोधला थोर ॥ मग पडंला अंधकार । अर्का विण न चाले वेव्हार ।। महीमंडळी ।।८२॥ असो पडिला अंधकार ।। अर्के सांडिला वेव्हार ।। ऐसा भरला येक संवत्सर ।। आदित्याविण ।। ८३ ।। अर्का विण बहु आटले जीव ।। हाहाकार जाला प्रबळ ।। मग मिळाले तिन्ही देव ।।