Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

महिकावती (माहिम)ची बखर

मझर ।। संवत् ११३५ बिंबदेवा सवें कुळे सोमवंस २७ ।। त्या मध्ये मुखें इतर जात ।। मुख्य कुळें ।। राव १ राउत २ रुत ३ ठाकुर ४ ठकर ५ ठाकरे ६ चुरी ७ चौधरी ८ चोरघे ९ ह्मांल १० ह्मातारे ११ कडु १२ महंत १३ रक्ती १४ पुरो १५ राणे १६ राज १७ साहाणे १८ जीत १९ सींग २० सीळ २१ घरथ २२ मघर २३ दुमोघ २४ भठी २५ पदक २६ सवं २७ ॥ हीं खुम मुख्य ।। तयासि गोत्रे कुळस्वामिणी ॥ या उपर जात ॥ कवळी १ दरणे २ भोईर ३ पड्या ४ माळी ५ घरठी ६ भटयारी ७ सांखळे ८ उभार ९ नाईते १० गाण ११ विर १२ ॥ ही बारा खुमे जात ।। यास गोत्रे देवनाम ।। या उपर ईतर ॥ छ ।।

या उपर नवकुळें शेषवंशि ।। राउत शस्त्रधारि इनाम खातात ।। पुर्वि विंबा समागमि आले ।। तयांचा संप्रदाय या वसइंस बहुत असे ।। ताड माड उद्यमी खुमाइत ।। तीन हजार सजगाणी पुर्वि खत भोगळे हस्तिंचे पंधरासें हुनाचें ईजारा करुन सर्व संप्रदाइ बारा पाखाडिया आगर वसइ मुख्य हांटदळा जागेजागे राहोन आपल्यात पाटेल जाले ।। बारा करुन राहिले आहेत ।। हा यिजारा वरसास स्वामी मुलुखाधिश यास सांगावा ॥ दुसरें काहि लागत नाही ॥ जर यांस शस्त्र धरायास हा बकसिस केला तर जैसा पुर्वि होता त्या प्रमाणे साहेबि चालविला तर युद्धास सादर होतिल ॥ हे हेर विठलचुरि यान सांगितली ।। हें आयकोन खानसाहेबि आदा केशव राउत सर--पाटेल खुमाचे त्यांस बोलाउं पाठविलें ।। प्यादा पाटलाचे घरि जाउन दिवानचा निरोप दिधला ॥ जर खानसाहेबी तुम्हास हुजुर बोलाविलें असे ।। केशव राउतें कबुल केलें व निरोप प्याद्यास दीधला जर बडि फजर साहबकें कदम पासि करनेकु हुजुर खडे होउं ।। हा निरोप याद्यास दीधला ॥ उपर विचार केला ।। जर आज दिवस पांच जमाईत मदलसिस होतों तेधवां काहि पुसति विचारणि न केलि व आज बोलाउं पाठविलें यास कारण काये ॥ जाणुन आपला पुत्र रामराउत समागमी मनुष्य देऊन सिरपत नायक स्वकुळगुरु व दिवान हकिम जाणुन मांडळैस बोलाउं पाठविलें ।। त्यांहि रामराउत देखिला ।। केशव राउताचा आमंत जाणुन सत्वर समागमि आले ।। देखता च केशवराव प्रणिपत्य करुन चरणि लागले ।। इयेरिं आशिर्वाद देउन आळंगिले ।। उभये डोहोलारि बैसले ।। येव्हडे रात्रि आमंत सत्वर कां हे साकल्य व्रतमान सांगितलें ।। ते समई सिरपतनायक बोलिला ।। जर मी दरबारासं असतां विठल चुरि आला होता।। खानसाहेबांसी बहुत मजकुर करित होते ।। परंतु मज तुह्मा विसीं बोलतां काहि आइकिले नाहि ।। परंतु मज तर्क दिसोन येते जर बाहादुरपुरा वसवायास इछा खानाची असे ।। कांहि तुह्मा पासुन समुदाय करविल तर तुह्मी या समइं आपले कुळाचा अभिमान धरुन बाहादरपुरि वसाईत करा व सरपाटेलकिचे पद खानसिक्यांसि महजर करुन घ्या ।। तथे बहुत युक्ति आहेत त्या मजलसित आह्मि पुर्वपक्ष करुन निट करुं ॥ हा विचार केशवराउतास मानला ॥ सूर्योदई मदलसिस केशवराउत आपले खुम वसइत आले ॥ खानसाहेब जोहारिले ।। खानि बैसकार दिधला । विठलचुरि आपले ससुदाई खान जोहारिस आले ।। सर्व जमाईतदार मिळाले ।। मदलसि भरली ।। या उपर केशवराउतें तसलिम करुन खानसाहेबा प्रति अर्ज केला ॥ जर साहेबि सेवकास काल निरोप पाठविला, जाणुन कदम हुजुर. असे, फरमाईस केलि पाहिजे ॥ हें आयकोन अंतरि खुशाल जाला ॥ जर राउत दक्ष देखिला ।। जाणुन बोलता जाला ।। जर गत मदलसित या दुस-या खुमाचा निवाडा टिळा वोर पान बिडा याची कजिया चुकविला ते समइं राउत किसबास्ते चूप रहें थें ।। ईसबास्ते आज तमारि कुल वतनाई ठिकान जागिर बतन ईनामकी खबर मेरे तें दे ।। हें आइकतां केशवराउत उठोन तीन तसलिमा करून रजा मागितली ।। खानी रजा देतां जाऊन सिरपत नायकाचे चरणावर मस्तक ठेवीला ।। हें देखुन खान मनी विस्मीत जाला ।। जर हें मोठें अपुर्व असे ।। पण उगाच राहिला।। त समइं सिरपत नायक उठोन तीन तसलिमा केल्या ।। त समइं खाने समीप बैसकार दिधली ।। व पुसिलें जर सब हकिकत कहो ।। ते समइं महजर श्रीबिंबा पासुन यावत् डफरखान जमाईत माहिमास राज्य अधिकारि तयाचे हस्तीचा महजर तो पंडितान रसनोसी दुभासया हस्तें दीधला ।। त्याणे वाचुन खानसाहेबास दाइम कथा जर धौडिनायक सांडेरेयां पासुन पेढ्या ३ ॥ केशवनायकांस महजर त्याचे नामाचा ।। त्या पासुन पेढी ५ हे सिरपत नायक ।। हे त्या राउत खुमाचि कुळें नव ॥ चोधरी १ राउत २ राणे ३ पुरो ४ ह्मातार ५ वरातदार ६ कडु ७ ठाकुर ८ ह्मतारे ९ ।। गोत्रं कुळस्वामिण पदे सर्व समवेत ।। हे शेषवंशि धारेचे राउत ।। यांचे कुळगुरु तयाचे जाणुन हे सर्वासि घेतिल ।। ह्मणुन व आह्मा माराष्ट्रधर्माची नित गुरुत्व ब्राह्मण जाणुन केशवराउतें चरण वंदिल ।। जर तयांचि उत्पती सर्व तया मुखीं साहेबास श्रृत होईल ।। तयांहि आपला महजर दाखउं सांडोरपाखाडिचें ईनाम व कुळगुरुत्व महजर सीके पत्रीं सर्व साहेबास कळाया करितां कदमि साहेबाचे ठेविला ।। हे आइकोन खान खुशाल जाला ।।