मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

अबदुल समदखान कडपेकर क्रांजे                                             लेखांक ८.                                                    १७१४ कार्तिक वद्य ७.
पत्राचा जबाब छ २० र॥वल.

नवाबसाहेब मेहेरबान दोस्तान सलमहूता आला-
बादज षौक मुलाकात मषहुद आंकी येथील खैर जाणून आपली शादमानी कलमी केली पाहिजे दिगर मजमून आपल्याकडून नारायेणराव आले त्यांणी ईजहार केल्यावरून व बाद व्यंकटराव यांचे हमराहा खत पाठविले ते नेक वख्तीं पोहचवून कैफियेत मुफसल जाहीर जाली येण्याचा मजमून कलमी केला चुनाचे नवाब अजमुल-उमरा-बाहादूर यांचे फर्जद मुषीरुदौला सेफुलमुलीक यांची तबियेत कसलमंद होती सबब दरबारची आमद रफ्त कमी आणि आमचीहि तबियेत दुरुस्त नाहीं या सबबाकरितां आं मेहेरबानास येथें येण्याची तसदी देण्यांत आली नाहीं बिल फैल येथून फार नजीक आं मेहेरबानाचे येणे होऊन मुलाकात नाहीं हेंही नामुनास बयान करितां येथे आं मेहेरबानाचे येण्याचा इत्यफाक व्हावा येविषयीं मुफसल नारायेणराव यांसी बोलण्यांत आले म॥र निल्हे लिहितील त्यावरून रोशन होईल आं मेहेरबानाची मुलाकात जाल्या बाद कैफियत जाहीर होऊन नवाब मेवसुफ यांसी बोलण्यांत येईल आपल्याकडील कामाची सही व कोसीस करण्यास इकडून कसूर व्हावयाचा नाहीं बयान लिहिणे कशास रा छ २० रावल.