एणेप्रमाणे बाउजी बिन कान्होजी हैबतराऊ येणे आपली देसमुकीची तरफ खावी. दुसरी तरफ हबाजी हैबतराऊ बिन बाबाजी हैबतराऊ व बालाजी बिन रुद्राजी या दोघीजण देसमुखीची एकीतरफ खावी. नागर बाउजीने आपले तरफेस करावा दुसरा नागर हबाजी बिन बाबाजी हैबतराऊ याणी आपली ता। व बालाजीची तकसीम दोन्ही तकसिमा मिलोनु एक तरफ केली आहे, ते तरफेस बाबाजीने करावा. पाने लुगडी दिवाणातुनु अनावा. हरएक जागाहुनु देतील ती आधी बाऊजी बिन कान्होजी हैबतराऊ याणे घ्यावी. याउपरी हबाजी बिन बाबाजी हैबतराऊ याणे घ्यावी. त्याउपरी बालाजी बिन रुद्राजी त्याणे घ्यावी. या तिघाजणासी पाने लुगडी उलीने देतील ते उलीस फुलाजीस व बाजीस यासि पाने लुगडी द्यावयासी समंधु नाही. देसकास जेधवा पाने लुगडी देतील ते उलीस आधी फुलाजीस व बाजीस द्यावी. त्या मागून खोतासी व मोकदमासी द्यावी. तरफा आपलालेया लावाविया. येरायेराचे तरफेस कांहीं निसबती नाही व पटीहि दुमाल करणे पडले तरी दोनी तरफा लिहणे आणि दफाती ह्मणौनु फुलाजी व बाजीचे गाव ल्याहावे. सदरी लिहिले आहेती ते व तुलजी व साऊजीचा गाव ऐसे ल्याहावे. एणेप्रमाणे आपले तरफाचे गाव लाउनु सुखे निवडिलेप्रमाणे वर्तणूक करणे. एणेप्रमाणे लेकराचे लेकुरी खाउनु सुखी असणे. निवडिलिया कामास जो कोण्ही हिलाहरकती करील त्याणे दिवाणांत पाच सिसे व पाच हजार होनु देणे. व मिरासी वेगला हक हजर सही मोर्तब सुद. पेसजीचे जे कागद ज्यापासी असेतील ते रद असेती. मोर्तब सुद. पेसजीचे कागद बाप-भावकीचे भाउपणाचे असतील ते रद असेती मोर्तब सुद. फारसी

तेरीख २० माहे रमजान''
रमजानु